दीर-भावजयीने विषप्राशन करून भर रस्त्यात घट्ट मिठी मारत मृत्यूला कवटाळले..

औरंगाबाद जिल्ह्यामधील करमाड मध्ये काल एक धक्कादायक घटना घडली. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर विष प्राशन करून एक प्रेमी जोडपे आले.

विष प्राशन केल्यामुळे चालताना दोघांनाही चक्कर येत असल्यामुळे सारखे झोक जात होते, त्यामुळे दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघेही तडफडत खाली कोसळले. पिष शरीरात भिणल्यामुळे दोघानाही उलट्या होऊ लागल्या.

त्या दोघांची अवस्था पाहून आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित केलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे दीर-भावजय होते. आठ दिवसांपूर्वी मृत्यू पावलेली महिला जिचे नाव सत्यभामा कदम असे असून ती तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सत्यभामा कदम ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या.
दोन दिवसांपूर्वी बहीण मिळाली होती तर पोलिस सत्यभामा कदम हीचा तपास करत होते. सत्यभामा कदम आणि तिचा चुलत दीर मयत काकासाहेब कदम याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वाहनचालक आणि गृहिणी

या घटनेतील तरुण काकासाहेब कदम हे शेती करून मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर सत्यभामा कदम या गृहिणी होत्या. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल हे सदर घटनेचा पुढील तपास करीत आहे.

मोबाईलमुळे पटली ओळख…

पोलीस घटनास्थळी आल्यावर काही अंतरावर मोबाईल पडलेला होता. त्यावरून त्यांची ओळख पटली. परंतु मोबाईलमध्ये अजून काय रेकार्डिंग आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!