Bajaj Home Finance: Bajaj Home Finance देत आहे फेस्टिव्हल होम लोन्स! ते सुद्धा कमीत कमी व्याजदरात.

Bajaj Home Finance
Bajaj Home Finance: बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ही बजाज फायनान्स लिमिटेडची उपकंपनी असून ही आपल्या भारत देशातील अग्रगण्य आणि दर्जेदार वैविध्यपूर्ण फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी (A leading and highly diversified financial services company in india) पैकी एक असून या कंपनीने नुकतेच गृहकर्ज (Bajaj home finance home loan)वर या सणासुदीच्या काळात आकर्षक फेस्टिव्ह ऑफरची सुरुवात अनावरण केले आहे. या विशेष ऑफरमध्ये पगारदार अर्जदारांसाठी केवळ 8.50 टक्के दराने सुरू होणारे अविश्वसनीय स्पर्धात्मक व्याजदर सुद्धा सामील आहेत

ही Festive offer ग्राहकांना उद्योगातील सर्वात कमी समान मासिक हप्त्यांचा (EMI) लाभ प्रदान करत असते, ज्याची सुरुवात फक्त रुपये 729 प्रति लाख अशी आहे. याशिवाय, ही ऑफर 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर (A higher credit score) असलेल्या अर्जदारांसाठीच लागू आहे. या ऑफर मधील होम लोन हे 13 सप्टेंबर 2023 ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत.

यासाठी इच्छुक ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तिच्या कोणत्याही शाखेला भेट देऊन गृह-कर्ज मिळवण्याचा पर्याय देण्यात आला असून Bajaj Home Finance गृह कर्जे 48 तासांच्या आत निधीची 100 टक्के हमी देणारे तसेच सोयीस्कर परतफेडीचा पर्याय आणि जलद वितरण प्रक्रियेसह अनेक आकर्षक वैशिष्ट्यांची ऑफर देतात. याव्यतिरिक्त, बजाज हाऊसिंग फायनान्स गृहकर्ज 40 वर्षांपर्यंतच्या परतफेडीची मुदत आणि प्रचलित रेपो दराशी तुमचा व्याजदर जोडण्याची क्षमता यासह अनेक अतिरिक्त वैशिष्ट्यांसह येते.

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडशी संबंधित प्रमुख अटी आणि शर्ती: Key Terms and Conditions relating to Bajaj Housing Finance Limited

Finance housing finance ही बजाज फायनान्स लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, ही एक प्रमुख नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (A non-banking financial company) असून तिच्या विविध प्रकारच्या वित्तीय सेवांसाठी ओळखली जाते. Bajaj Home Finance संपूर्ण भारतातील 72.9 दशलक्ष व्यक्ती आणि व्यवसायांना भरीव ग्राहक सेवा देते.

बजाज फायनान्स कंपनीचे मुख्यालय पुणे या ठिकाणी असून बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता (Residential or commercial property) खरेदी आणि नूतनीकरणासह विविध उद्देशांसाठी व्यक्ती आणि व्यवसायांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात माहिर आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी मालमत्तेवर कर्ज देऊन वैयक्तिकबरोबरच व्यावसायिक या दोन्ही गरजा पूर्ण करतात. ही कर्जे तारण म्हणून प्रदान केलेल्या मालमत्तेच्या मूल्यावर सुरक्षित ठेवली जातात.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED व्यवसायांच्या विस्ताराकरिता आणि ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्याकरिता चालू भांडवल कर्ज सुद्धा पुरवते. ही कंपनी निवासी आणि कमर्शिअल प्रॉपर्टी बांधकामातील रिअल इस्टेट डेव्हलपर्सना (Real estate developers) सुद्धा वित्तपुरवठेचा पर्याय प्रदान करत असते. डेव्हलपर्स आणि उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींना बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड लीज रेंटल डिस्काउंटिंगचा सुद्धा ऑफर करते.

Bajaj home finance home loan कंपनीला CRISIL व इंडिया रेटिंग्स सारख्या प्रतिष्ठित एजन्सीने उच्च क्रेडिट रेटिंग (High credit rating) दिले असून ही रेटिंग कंपनीची आर्थिक स्थिरता आणि क्रेडिटची योग्यता दर्शवते. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जवळ दीर्घकालीन कर्ज प्रोग्रामसाठी AAA अशी स्टेबल रेटिंग आहे, जे कंपनीचा मजबूत क्रेडिट प्रोफाइल दर्शवते. याशिवाय, CRISIL आणि इंडिया रेटिंग्सकडून या कंपनीला अल्प-मुदतीच्या कर्ज प्रोग्रामसाठी A1+ रेटिंग मिळाले आहे.

गृहकर्जाचे प्रकार खालील प्रमाणे: Types of Home Loans

बजाज फिनसर्व्ह ग्राहकांच्या विविध गरजांबरोबरच प्राधान्यांनुसार तयार करण्यात आलेले गृहकर्ज पर्यायांची विविध श्रेणी ऑफर करत असते. बजाज फिनसर्व्ह कंपनीद्वारे प्रदान केलेले विविध प्रकारचे गृहकर्ज खाली दिले आहेत:

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर (Home Loan Balance Transfer): होम लोनचा हा पर्याय तुम्हाला तुमचे सध्या चालू असलेले गृहकर्ज बजाज फिनसर्व्हकडे सोपवण्याची परवानगी देतो. असे केल्यामुळे तुम्ही कमीत कमी व्याजदर आणि वाढीव परतफेडीचा कालावधी बरोबरच अतिरिक्त आर्थिक गरजांकरिता टॉप-अप यासारख्या फायद्यांचा लाभ घेऊ शकता.

◆ टॉप-अप कर्ज (Top-up loan): टॉप-अप कर्जासह म्हणजे तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर अतिरिक्त कर्ज मिळवू शकता. ही अतिरिक्त रक्कम तुम्ही विवाहसोहळे, मेडीकल इमर्जन्सी, शैक्षणिक खर्च अथवा तुमच्या इतर कोणत्याही आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी अथवा विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते.

◆ प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana): या योजनेतंर्गत तुम्हाला पात्रता निकष पूर्ण केल्यावर प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत बजाज फिनसर्व्ह गृहकर्जासाठी अर्ज करता येईल. प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ही योजना 6.5% पर्यंत भरीव व्याजदर सबसिडी देते (bajaj finance home loan interest rate).

◆ संयुक्त गृहकर्ज (Joint Home Loan): जोडीदार (पार्टनर), भावंड अथवा पालकांसह संयुक्त गृहकर्जाची निवड केल्यामुळे खर्चात बचत होते. यामध्ये दोन्ही सह-अर्जदारांची कर्जाची परतफेड करण्यासाठी जबाबदारी समान असते.

◆ महिला गृहकर्ज (Women’s Home Loan): बजाज फिनसर्व्ह विशेषत: महिलांकरिता तयार केलेले गृहकर्ज ऑफर करते. ही कर्जे स्पर्धात्मक व्याजदर देऊन महिलांना स्वतंत्रपणे घरमालक बनव्यण्यासाठी आणि त्यांची मालमत्ता (प्रॉपर्टी) तयार करण्यास सक्षम बनवतात.

◆ गृह बांधकाम कर्ज (Home Construction Loan): या व्यवस्थेमध्ये आपण आपल्या स्वत:च्या जमिनीवर किंवा प्लॉटवर घर बांधण्यासाठी गृह बांधकाम कर्ज वेगळे टॉप-अप कर्ज वैशिष्ट्यासह येते. हे टॉप-अप कर्ज घराचे नूतनीकरण किंवा नव्याने बांधलेल्या घराशी संबंधित इतर खर्चांकरिता वापरले जाऊ शकते.

◆ प्लॉट खरेदी कर्ज (plot loans): जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या शहरात प्लॉट खरेदी करू करायचा असाल्यास बजाज फिनसर्व्ह त्यासाठी सुद्धा सुलभ कर्जाची ऑफर करते.

◆ व्यावसायिकांकरिता गृहकर्ज (Home Loans for Professionals): बजाज फिनसर्व्ह ही कंपनी खाजगी क्षेत्र,, सरकारी आणि बँकिंग उद्योगातील व्यावसायिकांकरिता आणि कर्मचार्‍यांसाठी त्यांच्या गरजेनुसार विशेष गृहकर्ज प्रदान करते. ही कर्जे अनेकदा कमी व्याजदर आणि सवलतींसह येतात.

Similar Posts