सोमवारपासून औरंगाबाद शहरातील ‘हे’ वर्ग सुरू करण्यास महानगरपालिकेची परवानगी …..

राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु स्थानिक परिस्थिती पाहता प्रशासनाने घ्यावा असेही या आदेशात म्हटले आहे.

त्यानुसार शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतरांसोबत केलेल्या चर्चेनुसार मार्गदर्शक सूचनानूसार महानगरपालिका हद्दीतील फक्त इयत्ता दहावी व बारावी चे ऑफलाईन वर्ग अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे अटी ?

>> दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे कोविड लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील.

>> विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही.

>> विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे आवश्यक आहे.

>> विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोना पोझीटिव्ह झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद निजंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्लाने वैद्यकिय उपचार सुरु करावेत.

>> ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या पहिला डोस घेतलेला असेल अशाच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिला मात्रा घेतलेला नसेल त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.

>> ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन/ दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावे.

>> सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खाजगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

>> विद्यार्थ्यांना आवशयक्तेनुसार शाळेत टप्प्याटप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलविण्यात यावे.

>> विद्यार्थ्यांना शाळेत मध्यांतराची सुट्टी न देता वर्गातच सुरक्षीत अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी.

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यासंदर्भात आज आदेश पारीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!