अविस्मरणीय क्षण !! क्रांती चौकातील चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान..

10 फेब्रुवारीला होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन.

औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा चौथऱ्यावर बसविण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

▪️शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर परवा मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे.

▪️ क्रांती चौक येथे गेल्या 48 तासापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पहाटे पाच वाजता चबुतऱ्यावर पुतळा बसवण्यात आला आहे.

Similar Posts