औरंगाबाद जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्ण संख्या..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 07 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 15 जण कोरोनामुक्त, तर 212 रुग्णांवर उपचार सुरू..
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 15 जणांना (मनपा 11, ग्रामीण 4) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 682 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 07 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 625 झाली आहे.
आजपर्यंत एकूण तीन हजार 731 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (06)
मुकूंदवादी 2, अन्य 4
ग्रामीण (01)
मृत्यू (01)
खासगी (01)
1.60 स्त्री, कांचनवाडी औरंगाबाद