महिलेच्या “त्या” भागात होत होत्या असह्य वेदना, चेकअप केल्यावर समोर आलं धक्कादायक सत्य..!

या दुनियेत अशा काही विचित्र घटना सतत घडत असतात, ज्या वाचून लोक हैराण होतात. सोशल मीडियावर अशा घटनांची नेहमीच चर्चा होत असते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. आफ्रिकेतील एका देशात महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून ऑपरेशन करून अशी वस्तू काढण्यात आली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. तशी तर ही पहिली घटना नाही ज्यात महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून विचित्र वस्तू अडकल्याची घटना समोर आली.

एका ४५ वर्षीय महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून काचेचा काच ऑपरेशनद्वारे काढण्यात आला, जो पाहून डॉक्टरही थक्क झाले. हा ग्लास तीला गेली चार वर्षे वेदना देत होता.

ट्युनिशियामध्ये एका ४५ वर्षीय महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून ऑपरेशनद्वारे अशी गोष्ट काढण्यात आली, जी पाहून डॉक्टरही थक्क झाले. वास्तविक, महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र वेदना होत असल्याने ती डॉक्टरांकडे गेली होती. तपासणी अंती त्यांच्या मूत्राशयात अडकलेल्या काचेच्या ग्लासमुळे तिला गेल्या चार वर्षांपासून वेदना होत असल्याचे आढळून आले.

4 वर्षांहून अधिक काळ प्रायव्हेट पार्टच्या दुखण्याने त्रास होत होता आणि त्यासाठी तिने खूप उपचारही केले आणि डॉक्टरांचा सल्लाही घेतला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नेहमीच वेदना होत असल्याने, त्यामुळे महिलेला वारंवार लघवीला जावे लागायचे.

पण तिला आराम मिळाला नाही आणि हा त्रास बराच काळ वाढतच गेला, त्यामुळे ती महिला आणि तिचे कुटुंबीय खूपच त्रस्त झाले आणि त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता.

तपासणीत आढळली ही गोष्ट.

चेकअपमध्ये असे आढळून आले की महिलेला कोणताही संसर्ग झालेला नाही, परंतु तिच्या ब्लॅडर स्टोनमध्ये 8 सेमी काचेचा ग्लास होता जो महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून मूत्राशयापर्यंत पोहोचला होता. आश्‍चर्याची बाब म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून या महिलेच्या शरीरात काचेचा ग्लास होता.

त्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन करून हा ब्लॅडर स्टोन काढण्यात आला आणि तो शरीरातून बाहेर आल्यावर डॉक्टरांना धक्काच बसला कारण त्यामध्ये काचेचा ग्लास अडकून पडल्याचे निदर्शनास आले. मात्र हा ग्लास तिच्या शरीरात कसा पोहोचला हे स्पष्ट झालेले नाही.

हे ऑपरेशन 2021 च्या अखेरीस करण्यात आले होते, परंतु आता सोशल मीडियावर या ऑपरेशनचे काही फोटो समोर आल्यानंतर याची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!