धक्कादायक..! चार वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलांचा अत्याचार! वाळूज बजाजनगर येथील घटना..
सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी शेजारील एक 13 वर्षीय व दुसर्या 10 वर्षीय मुलाने चिमुकली खाऊ देत आपण गच्चीवर जाऊन खाऊ असे म्हणून गच्चीवर नेले. तेथे नेल्यावर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
▪️घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने रडत आईकडे जाऊन सांगितली. तिच्या आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आपल्या मुलीवर शेजारील दोन मुलांनी अत्याचार केल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिच्या आई वडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
▪️घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी माहिती जाणून घेतली व दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.