धोक्याची घंटा..! औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या जवळ..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 71 जण कोरोनामुक्त, 1839 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 60, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 52 हजार 16 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1839 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (410)
संभाजी नगर 1, रामनगर 2, मिनी घाटी 1, चिकलठाणा 5, एन-3 येथे 3, गजानन नगर 1, हर्सुल 3, बीड बायपास 13, सातारा परिसर 3, समता नगर 1, वानखेडे नगर 1, पडेगाव 9, भावसिंगपुरा 1, म्हाडा कॉलनी 5, जुना बाजार 1, मयूरनगर 2, एन-8 येथे 4, पिसादेवी 1, ब्रिजवाडी 1, भारत नगर 1, होनाजी नगर 1, एन-7 येथे 3, मोंढा नाका 1, खडकेश्वर 1, एन-5 येथे 3, नारेगाव 1, बायजीपुरा 1, एन -6 येथे 5, जयभावनी नगर 4, जीएमसी कॅम्पस 1, एन -11 येथे 1, सिम्प्ली सिटी 1, दर्गा रोड 1, गारखेडा 3, पिसादेवी 1, कल्पवृक्ष सोसायटी 1, सिडको 1, समर्थ नगर 3, कॅनरा बँक 1, बन्सीलाल नगर 1, औरंगपुरा 1, राज नगर 1, सूतगिरणी चौक 1, टिळकनगर 1, मुकुंदवाडी 2, अन्य 310
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (74)
औरंगाबाद 24, फुलंब्री 2, गंगापूर 11, कन्नड 7, खुलताबाद 1, सिल्लोड 4, वैजापूर 10, पैठण 14, सोयगाव 1