MPSC अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा; औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती..!

Government recruitment : महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांसाठी एकूण 800 रिक्त जागा भरण्याकरीता पदांच्या पात्रतेनुसार योग्य असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. MPSC recruitment

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक
पद संख्या – 800 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क –
• अमागास – रु. 394/-
• मागासवर्गीय- रु. 294/-
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 जुलै 2022
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb

पगार :- 38600-122800 प्रति महिना

1) नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
2) विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
3) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
4) अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. MPSC recruitment

MPSC पूर्व परीक्षेमधील रचनेत महत्‍वपूर्ण बदल MPSC recruitment

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या) राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेमध्ये महत्‍वपूर्ण बदल केलेला आहे. त्‍यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार असून या पेपरमध्ये 33 टक्‍के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या निर्णयामुळे कला आणि वाणिज्‍य शाखेमधील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे तज्ञांचे मत आहे.

कसा असेल बदल.

MPSC महाराष्ट्र राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 2 तपासल्‍यावर, ज्‍या उमेदवारांना किमान 33 % गुण अर्थात 66 किंवा त्‍यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 तपासला जाईल. पेपर क्रमांक 1 च्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून “सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍यामुळे कला आणि वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे.

सर्वांना समान संधी : आत्तापर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकतील. Government recruitment

Similar Posts