Buy cars at low prices: बँकेने ओढून नेलेल्या गाड्यांची खरेदी करा, कारण येथे 1 लाखात कार तर 15 हजारात बाईक व स्कुटी मिळेल
Buy cars at low prices
Buy cars at low prices : प्रत्येकालाच वाटत असते की त्याच्या घरासमोर सुद्धा एक four wheeler किंवा tow wheeler असावी, मात्र वाहनांचे वाढते दर यामुळे सामान्य व्यक्तींना वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र आता सर्वसामान्यांचे सुद्धा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण तुम्हाला बँकेने ओढून नेलेली चारचाकी अवघ्या 1 लाखात तर बाईक/स्कुटी अवघ्या 15 ते 20 हजारामध्ये खरेदी करता येणार आहे.
कमी किमतीमध्ये कार कशी खरेदी करावी? bank auction for cars
असं होऊ शकतं का? तुम्हाला हा प्रश्न पडलाय ना? तर नक्कीच असे होऊ शकतं.. आम्ही या माहितीच्या आधारे तुम्हाला सांगतो की, तुम्हाला वाहन खरेदीचे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येणार आहे. बँका जेव्हा कोणालाही वाहन खरेदी करण्यासाठी loan देतात तेव्हा बँका ते कर्ज फेडू न शकलेल्या कर्जदाराच्या चारचाकी/दुचाकी वाहनांचा लिलाव करत असतात. या लिलावामध्ये वाहनांची किंमत अगदीच कमी म्हणजे EX Showroom किमतीच्या फक्त 30% एवढी असते. आता उदाहरणच द्यायचे झाल्यास एखाद्या four wheeler कारची किंमत 10 लाख आल्यास बँकांच्या लिलावामध्ये तीच कार तुम्हा 30% रकमेत म्हणजेच अवघ्या 3 लाखात खरेदी करता येते.
म्हणून बँका करतात वाहनांचा लिलाव
खूप साऱ्या बँका/ वित्तीय संस्था वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना वाहन कर्ज देतात. त्या बदल्यात ग्राहकांनी त्याचे हप्ते म्हणजेच EMI नाही भरल्यास बँका कर्जदारांना एक ठराविक मुदात देतात, त्या मुदतीमध्ये कर्जदारांनी चुकवलेल्या हप्त्यांची परतफेड करणे आवश्यक असते, पण, जर का कर्जदारांनी तसे न केल्यास बँका गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करुन उरलेली रक्कम वसूल करतात.
तुमचे स्वप्न असेल की तुमच्या दारात तुमच्या आवडीची कार/बाईक उभी असायला हवी तर मग तुम्ही बँकांच्या लिलावामध्ये भाग घ्यायलाच पाहिजे. बँका जेव्हा त्यांनी ओढून आणलेले वाहन लिलावात विक्रीसाठी काढतात तेव्हा अगदी नव्या गाड्या अत्यंत कमी किमतीत मिळते.
अशी असते बँकांच्या वाहन लिलावाची प्रक्रिया Participate in bank vehicle auction
खाजगी अथवा सरकारी बँकांच्या बाबतीमध्ये लिलावाची प्रक्रिया वेगवेगळी असून नियमबद्ध असते. तेथे सर्वात आधी लिलावाची तारीख जाहीर करण्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येते. या जाहिरातीच्या माध्यमातून फोर व्हीलर किंवा टू व्हीलर वाहन खरेदी करण्यास इच्छूक असणारे नागरिक लिलावाच्या ठिकाणी उपस्थित राहिल्यावर ठरलेल्या वेळेमध्ये बँकेचे अधिकारी लिलाव सुरु करतात. Buy cars at low prices वाहन लिलावामध्ये
बोली लावण्यापूर्वी गाडीची अनामत रक्कम भरणे बंधनकारक असते. .
वाहन लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडून एक ठराविक रक्कम अनामत म्हणून घेण्यात येते. ही अनामत रक्कम वाहनाच्या किमितीच्या 10 टक्के इतकी असू शकते.
बँकांच्या वाहन लिलावात सहभागी होण्याचे नियम Online vehicle auction process
जर तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावामध्ये सहभागी होऊन वाहन खरेदी करायचीअसल्यास तुम्हाला सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर नजर ठेवणे आवश्यक आहे. बँकांच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनच त्यांच्या वाहन लिलावाची तारीख जाहीर होते. bank auction for cars
वाहन खरेदी केल्यानंतर अशी करावी कागदपत्रांची पूर्तता.
बँकेच्या लिलावामधून तुम्ही खरेदी केलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची पुर्तता तिथेच लिलावात करुन घेणे गरजेचे असते. याशिवाय ते वाहन तुम्ही लिलावात बोली लावून खरेदी केलेले असल्याचा एक सर्टिफिकेट बँक तुमच्या नावाने जाहीर करते. ज्या सर्टिफिकेटचा उपयोग करून पुढे ते वाहन तुमच्या नावे करण्यासाठी होतो.