पत्नीला महिन्याला मिळणार 45 हजार रुपये, फक्त NPS खाते उघडावे लागेल.
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही भारतातील नागरिकांना वृद्धापकाळाची सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन कम गुंतवणूक योजना आहे. सुरक्षित आणि नियंत्रित बाजार आधारित परताव्याच्या माध्यमातून तुमच्या सेवानिवृत्तीचे प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी ही योजना आकर्षक दीर्घकालीन बचत मार्गाने सुरू होते. NPS पेन्शन फंड हे विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे नियंत्रित केली जाते.
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची पत्नी गृहिणी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी योजना तयार करत असाल. भविष्यात तुमच्या पत्नीने पैशासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर मोदी सरकार द्वारा संचालित न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडावे लागेल.
न्यू पेन्शन खाते तुमच्या पत्नीला वयाच्या 60 वर्षांनंतर एकरकमी रक्कम देईल. या बरोबरच तुमच्या पत्नीला दर महिन्याला पेन्शन म्हणून ठराविक उत्पन्नही मिळेल.
NPS खात्यासह, तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. यामुळे, वयाच्या 60 वर्षानंतर तुमची पत्नीला पैशासाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज राहणार नाही.
NPS खाते उघडा
1,000 रुपयांमध्ये उघडलेले NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत NPS खाते चालू ठेवू शकता.
₹ 5000 मासिक गुंतवणुक बनेल ₹1.12 कोटी.
उदाहरणार्थ, तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवता. आणि त्या वार्षिक गुंतवलेल्या पैश्यावर 10 टक्के परतावा मिळाला तर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांच्या खात्यात एकूण 1.12 कोटी ₹ जमा होईल. यातून त्यांना सुमारे 45 लाख एकरकमी मिळतील. शिवाय त्यांना दर महिन्याला 45000 रु. पेन्शन म्हणून मिळेल. हे पेन्शन त्याला आयुष्यभर मिळत राहील.
योजनेत कोण गुंतवणूक करू शकते?
NPS योजने मध्ये 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो. एका व्यक्तीला फक्त एकच NPS खाते उघडण्याची मुभा आहे.
( येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्यावा- Team- औरंगाबाद न्यूज )