मोठी बातमी; आता वेरुळ, अजिंठ्यासह प्रमुख पर्यटन स्थळं सुरू..
औरंगाबाद जिल्ह्यामधील लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 90% झाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नवी नियमावली लागू होईल असे आदेश जारी केले आहे त्यामुळे आता वेरुळ, अजिंठा लेणी, गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील.

काय आहे जिल्ह्यासाठीची नवी नियमावली ?
✔️ सर्व उद्याने आणि जंगल सफारी नियमित वेळेनुसार चालू राहणार.
✔️ ऑनलाइन तिकिटाद्वारे सर्व पर्यटकांना ही स्थळे पाहता येतील.
✔️ सदर पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या संख्येबाबत संबंधित विभागाचे नियंत्रक प्राधिकारी निर्णय घेतील.
✔️ पूर्णपणे लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच पर्यटन स्थळांवर प्रवेश मिळेल.
✔️ जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु राहतील. वेळेवर कोणतेही निर्बंध राहणार नाही.
✔️ स्पा, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी.
✔️ सर्व आस्थापनांनी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.
✔️ अंत्ययात्रेला कितीही व्यक्ती उपस्थित राहू शकतात; व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नाही.
✔️ लग्न सोहळ्यासाठी मात्र 200 व्यक्तीच उपस्थित राहू शकतील.
✔️ सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
✔️ स्विमिंग, वॉटर पार्क, खेळाच्या मैदानावर प्रेक्षकांना जाण्यास परवानगी.
✔️ उपचारापूर्वी रुग्णालयात रुग्णांना लसीकरणाविषयी चौकशी करण्यात यावी.
✔️ उपचारापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक असून लसीकरणाची विचारणाही केली जावी.
✔️ औरंगाबाद जिल्ह्यात आपापल्या कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या तसेच लसीकरणाचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

