खुलताबाद पोलीसांची म्हैसमाळ येथील कुंटणखान्यावर धाड, रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 26110 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
काल शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीतील महेशमाळ येथील हॉटेल आर्या मध्ये चंद्रकला भागाजी साठे रा. म्हैसमाळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद ही बाई औरंगाबाद येथून महिला बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते, एका ग्राहकाकडून पाचशे रुपये घेऊन स्वतः 250/- रुपये ठेवून घेते व देहविक्री करणारे महिलेस 250-/ रुपये देते ,
भूजंग हातमोडे यांनी त्यांना मिळालेली माहिती पोलिस अधीक्षक निमित गोयल तसेच कन्नड उपविभागाचे पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांना देऊन कारवाई करण्याची योजना आखली, भुजंग हातमोडे यांनी एक बनावट ग्राहक तयार करून, बनावट ग्राहकाचे इशाऱ्यानंतर कारवाई करण्याची योजना आखली.
भुजंग हातमोडे यांनी त्यांचे अधिपत्याखालील औरंगाबाद येथील स्त्रिया व मुली यांचे देहविक्री प्रतिबंधक पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना बोलावून घेतले, त्यांना माहीती समजावून सांगून, सापळा लावला, काल दिनांक 04/02/2022 रोजी सायंकाळी 4:00 च्या सुमारास बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी दोन पंचासह छापा मारला असता हॉटेल आर्या येथे चंद्रकला भागाजी साठे व महेश अंकुश भालेराव दोघे राहणार महेशमाळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद हे गि-हाइकाकडुन पैसे घेऊन त्यांना महिला पुरवत असल्याचे दिसून आले, सदर ठिकाणी एक महिला देहविक्रीचा व्यवसाय करताना मिळुन आली, पीडित महिला औरंगाबाद येथील असल्याचे समजले, पोलीसांनी हाॅटेल आर्या येथुन रोख रक्कम मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 26110-/रुपयांचा ऐवज जप्त केला असून वेश्याव्यवसाय चालवणारे चंद्रकला भागाजी साठे व महेश अंकुश भालेराव यांच्यावर खुलताबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, कन्नड उपविभागाचे पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे ए.एच.टी.ओ पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम सोळुंके, खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नवनाथ कोल्हे, योगेश ताठे, कारभारी गवळी, रमेश वराडे, रूपाली सोनवणे, जयश्री बागुल तसेच औरंगाबाद येथील पथकातील पोलीस अंमलदार दीपेश सुरडकर, शुभम श्रीखंडे, मंगल पारधे, ज्योती दिवेकर, मनीषा साळवी, मंजुषा हातकंगणे, जयश्री गलांडे यांनी केली आहे,