दीड महिन्यात सात मुलांशी लग्न करून आठव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलीला पोलिसांनी केले जेरबंद.
लग्नोत्सुक मुलांना शोधायचे आणि दोन- चार लाख घेऊन लग्न लावायचे असे एक रॅकेट औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागले आहे. चार महिलेबरोबर मिळून एका मुलीने मराठवाडा खानदेश बरोबरच गुजरातमध्ये दीड महिन्यात तब्बल सात जणांबरोबर लग्न करून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे.
जळगावातील शुभांगी शिंदे नावाच्या मुलीने चार महिला साथीदारांसह आजपर्यंत मुलांसोबत लग्न करून लाखोंचा गंडा घातला आहे. यासाठी मागील दीड महिन्यात सात जणांसोबत लग्न केले तर तिचा आठवा विवाह 25 एप्रिलला धुळ्यात होणार होता. मात्र त्याआधीच औरंगाबाद पोलिसांना तिला ताब्यात घेतले.
सविस्तर माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यामधील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी राजेशची ओळख जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्यासोबत झाली. या ओळखी मार्फत बबनने एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे राजेशला सांगितले. लग्नासाठी मुलीला 1 लाख 30 हजार दिले. 70 हजारांचे दागिणे केले आणि धडाक्यात त्यांचे लग्न लावले.
लग्नानंतर नवदाम्पत्य दौलताबाद किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले असता शुभांगीने राजेशला तुम्ही तिकीट काढा आणि मी आपल्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते असे सांगत तिथून निघाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत बसली आणि पसार झाली.
राजेशने शुभांगीची खूप शोधाशोध केली पण ती काही सापडली नाही. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला असता जी माहिती आली त्यातून पोलिसही थक्क झाले. शुभांगीने आशाबाई आणि लखाबाई नावाच्या मावशींसह अन्य दोन महिलांना मध्यस्थी करत गेल्या दीड महिन्यात तब्बल सात सात मुलांसोबत लग्न केल्याचं समोर आले..
यामधील आशाबाई, लताबाई आपल्या दोन मैत्रिणी जळगावमध्ये अशा प्रकारचे रॉकेट चालवत असून त्यांना शनिवार पेठ पोलिस ठाण्यामध्ये अशाच प्रकारचे लग्न लावल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र. जामीनावर सुटका त्यांनी पुन्हा हा गोरखधंदा सुरू केला.