सासरच्या घरुन मुलीला नेले फरफटत, प्रेमविवाहाला विरोध असलेल्या आई-वडिलांचे भयंकर कृत्य.. व्हिडीओ व्हायरल..

प्रेम विवाह केला म्हणून रागावलेल्या आई वडिलांनी, सासरच्या घरात घुसून मुलीला रस्त्यावरुन ओढत घरी नेल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अंबाडा गावात समोर आला आहे. सदरील घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

प्रेमविवाह करून सासरी मुलगी आली असताना, तिचे आई-वडील खूप संतप्त झाले आणि तिच्या घरात घुसून मुलीला तिला फरफटत घराबाहेर आणले.

सविस्तर माहिती अशी की, एकमेकांवर प्रेम करत असलेल्या तरुण मुला मुलीने दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी आर्य समाज मंडळात विवाह केला. मुलीच्या आंतरजातीय लग्नाला तिच्या आईवडिलांचा विरोध होता. दिनांक 4 मे 2022 रोजी मुलीचे आई वडील सासरी येऊन मुलीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर काढले, या ओढतानीत ती तरुणी घरासमोरच्या पायऱ्यांवरुन खाली पडली, मात्र तरीही आई वडिलांना तिची कीव आली नाही.

अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे सासरच्या मंडळीही चक्रावून गेली . मात्र तोपर्यंत या आईवडील तरुणीला घेऊन तिथून निघून गेले. सासरच्यांनी तिला सोडवण्यासाठी मागे धाव घेतली खर , मात्र त्यात ते यशस्वी होऊ ठकले नाहीत

चौकशी करुन कारवाई करणार – पोलीस

सदरील संपूर्ण घटना घराच्या शेजारी असणाऱ्या एका मुलीने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केली. या मुलीची चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Similar Posts