राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्मार्ट कार्ड योजना राबवली जात आहे. १ जूनपासून ज्येष्ठ प्रवाशांना भाड्यात सवलत हवी असेल तर स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जेष्ठ नागरिक तसेच अनेक नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये सूट दिली जाते. याकरिता जुने ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, जुन्या ओळखपत्रावर खूप वेळा गैर-प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी महामंडळ प्रशासनाकडून प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेण्याकरिता पूर्वी ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ पासून केलेल्या संपामुळे स्मार्ट कार्ड प्राप्तीसाठी ३१ मे २०२२ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ मे पर्यंत प्रवासभाड्यात सवलत घेण्यासाठी पात्र असलेल्या प्रवाशांनी स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे, अन्यथा १ जूनपासून प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड नसेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ मिळणार नाही.

एवढेच नाही तर, आगारास प्राप्त झालेली स्मार्ट कार्ड तातडीने संबंधितांना वाटप करावे आणि आगारात कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्ट कार्ड शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना एसटी महामंडळात प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Similar Posts