महागाईचा बूस्टर डोस : यावर्षीही महागणार सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन, किमतीत होऊ शकते 12% वाढ..
2016च्या आधी भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या होत्या, पण 2016 मध्ये जिओच्या आगमनानंतर मोबाइल क्रांती झाली आणि जणू काही फ्री डेटा प्लॅन्स, फ्री कॉलिंगचा महापूरच आला.
Jio च्या पावला वर पाऊल ठेवत Airtel आणि VI ने देखील ग्राहकांना मोफत सेवा द्यायला सुरुवात केली, पण आता ही फ्रीचे युग संपत चालले आहे. टेलिकॉम कंपन्या दरवर्षी त्यांचे प्लॅन महाग करत आहेत, त्यामुळे लवकरच सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन 2016 च्या पूर्वीसारखेच महागडे होतील, अशी आशंका आहे.
एका अहवालानुसार, Jio, Airtel आणि VI सारख्या खाजगी कंपन्या यावर्षी दिवाळीपर्यंत त्यांचे प्री-पेड प्लॅनचे दर 10% ते 12% ने महाग करू शकतात, म्हणजेच जर आज एखाद्या प्लॅनची किंमत 100 रुपये असेल तर दिवाळीनंतर त्याची किंमत रु. 110 ते 112 होईल. असे म्हटले जात आहे की टेलिकॉम कंपन्यांना महागड्या दर योजनेचा फायदा होईल आणि त्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 10% वाढेल. या वाढीनंतर, Airtel, Jio आणि Vi चे ARPU अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये होईल.
जिओ या ग्राहकांना देत आहे चार दिवस मोफत डेटा
Jio ने आपल्या आसाममधील ग्राहकांना 4 दिवस मोफत डेटा आणि प्रतिदिन 1.5 जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. आसाममध्ये पावसामुळे आलेल्या मुसळधार पुरानंतर jio ने हा निर्णय घेतला आहे. आसाम मध्ये कार्बी आंग्लॉन्ग ईस्ट, दिमा हासाओ, कार्बी आंग्लॉन्ग वेस्ट, कचार, आणि होजई या सह अनेक जिल्ह्यामधील ग्राहकांना रिलायन्स जिओकडून एक मोफत योजना मिळेल, जी 4 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा प्रदान करेल.