Gram Panchayat Documents 2023 | ग्रामपंचायतीमधून कोण-कोणते दाखले निःशुल्क आणि किती कालावधीत मिळतात माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Gram Panchayat Documents | तुम्हाला शिक्षण अथवा इतर शासकीय कामांकरिता अनेकदा ग्रामपंचायतीकडून काही दाखले काढण्याची आवश्यकता भासते. परंतू ग्रामपंचायतीमार्फत तुम्हाला कोण-कोणते दाखले मिळतात, याची माहिती तुम्हाला आहे का? तुमच्या गावातील ग्रामपंचायत तुम्हाला कोण-कोणते दाखले किंवा प्रमाणपत्र देऊ शकते, याची माहिती प्रत्येक गावकऱ्याला असणे अत्यंत आवश्यक आहे.

Gram Panchayat Documents

शिवाय कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क भरावे लागते आणि ते दाखले (Gram Panchayat Documents) मिळवण्यासाठी किती कालावधीची मुदत असते, याची सुद्धा माहिती तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखामध्ये आपण यासंबंधीची सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५च्या कलम-३ अनुसार गावातील ग्रामपंचायत मार्फत देण्याच्या सेवा व त्यांचे शुल्क खालीलप्रमाणे (Gram Panchayat Documents)

 1. जन्म नोंदीचा दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 2. मृत्यूची नोंद दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 3. विवाह नोंदणीचा दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 4. गावातील रहिवाशी दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 5. दारिद्य रेषेखालील दाखला – कोणतेही शुल्क नाही
 6. हयातीचा दाखला – कोणतेही शुल्क नाही
 7. ग्रामपंचायत येणे बाकीचा दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 8. शौचालय असण्याचा दाखला – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 9. नमुना नंबर-८चा उतारा – 20 रुपये, कालावधी 5 दिवस
 10. निराधार दाखला – कोणतेही शुल्क नाही, कालावधी 20 दिवस
 11. विधवेचा दाखला – 20 रुपये, कालावधी 20 दिवस
 12. परित्यक्ता दाखला – 20 रुपये, कालावधी 20 दिवस
 13. विभक्त कुटुंब असल्याचा दाखला – 20 रुपये, कालावधी 20 दिवस
Gram Panchayat Documents

नियमाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दाखल्यांच्या (Gram Panchayat Documents) शुल्काचा फलक दर्शनी भागात लावणे अत्यंत आवश्यक असते. ग्रामपंचायतीत मिळणाऱ्या वेगवेगळ्या दाखल्यांमध्ये दारिद्रय-रेषेखालील दाखला, हयातीचा दाखला, निराधार असल्याचा दाखला कोणतेही शुल्क न भरता म्हणजेच निःशुल्क मिळतो. तर, जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदीचा दाखला, रहिवाशी असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकीचा दाखला, शौचालय असल्याचा दाखला, नमुना नंबर 8 अचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, परित्यक्ता असल्याचा दाखला, विभक्त कुटुंब असल्याचा दाखला घेण्याकरिता 20 रूपये शुल्क भरावे हा नियम आहे.

Land record : 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा; ते सुद्धा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर…

दाखले मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे

ग्रामपंचायतीकडून दाखले मिळवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची यादी ग्रामपंचायतीत उपलब्ध असते. अर्जाची फी भरल्यानंतर ग्रामपंचायत दाखला देते.

दाखल्यांचा कालावधी
ग्रामपंचायतीतून मिळणाऱ्या दाखल्यांच्या कालावधीमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, त्यामुळे दाखला घेण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधणे योग्य असते. ग्रामपंचायतीतून देण्यात येणारे दाखले हे तुमच्या अधिकारांचे संरक्षण करण्यास मदत करतात. या दाखल्यांच्या माध्यमामधून गावातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळेच तर प्रत्येक गावकऱ्याला ग्रामपंचायतीतून मिळणाऱ्या दाखल्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

 • ग्रामपंचायतीकडून दाखले घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
 • ग्रामपंचायतीतून मिळणारे दाखले हे सर्व सरकारी कार्यालयांत मान्य केले जातात.
 • दाखले मिळवण्याकरिता आवश्यक कागदपत्रे तयार करण्याकरिता ग्रामपंचायतचे कर्मचारी मदत करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!