IBPS PO Recruitment: बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर भरती सुरू: कसा करालं अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..

बँक मध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे.

IBPS PO Notification 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी (IBPS PO Recruitment 2022) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे 6,432 रिक्त जागा भरल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. प्रिलिम्सच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंटरव्यू राउंडसाठी बोलावले जाईल.

IBPS PO भर्ती 2022 रिक्त जागा तपशील

एकूण पदे – 6,432

1) बँक ऑफ इंडिया – 535 पदे.
2) कॅनरा बँक – 2500 पदे.
3) पंजाब नॅशनल बँक – 500 पदे.
4) पंजाब आणि सिंध बँक – 253 पदे.
5) UCO बँक – 550 पदे.
6) युनियन बँक ऑफ इंडिया – 2094 पदे.

● अर्ज सुरु झाल्याची तारीख – 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022
● पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा- ऑक्टोबर 2022
● PO भर्ती मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2022
● मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2023

IBPS PO भर्ती 2022 साठी खालील लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात.
https://ibpsonline.ibps.in/crppo12jul22/

वयोमर्यादा :
या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी 20-30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत अतिरिक्त सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे अचूक गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असावे.

आवश्यक कागदपत्रं

● बायोडेटा (Resume)
● 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
● शाळा सोडल्याचा दाखला
● जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
● ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
● पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज फी :
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 850 रुपये भरावे लागतील तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 175 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया :
या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात प्रिलिम्स परीक्षा, दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होईल. प्रिलिम्स परीक्षा एक तासाची असेल ज्यासाठी उमेदवारांना 100 गुण दिले जातील.

IBPS PO Recruitment 2022 या पदांसाठी अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Similar Posts