भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वैजापुरात उघड; चुलत भावानेच केले बहिणीवर 9 महिने अत्याचार..
भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र नात्यापैकी एक आहे, आणि हेच नाते आणखीनच मजबूत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन, आणि या सणा पूर्वीच भाऊ-बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वैजापूर तालुक्यात समोर आली असून, नराधम भाऊच आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून करत असलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या पीडित तरुणीने समाजात बदनामी होईल या भीतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी विरगाव पोलिसांनी आरोपी नराधम भावाला जेरबंद करून, त्याच्यावर पोक्सो तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, काल दिनांक 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचे वातावरण होतं. परंतु वैजापूर तालुक्यात पीडित मुलीने केलेल्या आत्महत्येचं खरं कारण समोर आल्यावर संपूर्ण जिल्ह्यातले नागरिक स्तब्ध झाले. सख्खा चुलत भाऊच तब्बल 9 महिन्यापासून करीत असलेले अत्याचार सहन न झाल्याने काल पीडित तरुणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येचे खरं कारण कळल्यावर पोलिसांनी नराधम बावला जेरबंद केले.
नराधम भाऊ आणि मृत पीडित तरुणी हे दोघेही नात्याने भाऊ-बहीण होते. 9 महिन्यांपूर्वी पीडिता घरी एकटी असताना आरोपी तेथे गेला. पीडिता एकटी असल्याची संधी साधून आरोपीच्या अंगात वासनेचे भूत संचारले व त्याने नात्याची तमा न बाळगता पिडीतेवर अत्याचार केला. तसेच, कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती..
मात्र यानंतर तर नराधम भावाची हिम्मत वाढतच गेली. त्याने वारंवार पिडितेवर अत्याचार केले. लागातार केलेल्या अत्याचाराने पीडित तरुणी गर्भवती राहिली, पीडितेच्या आईला सदरील बाब लक्षात आल्यावर तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर ही बाब समोर आली. त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल या मुळे तणावात असणाऱ्या पीडित मुलीने शेतात फवारणी करायचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.