औरंगाबाद मध्ये पाणीप्रश्न पेटला; जलकुंभाचे कुलूप तोडून पुंडलीकनगर मध्ये “शोले स्टाईल” आंदोलन..
💁🏻♂️ पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. मात्र, यावेळी आतमध्ये जाण्यासाठी कुलुप लावलेले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी दगडाने कुलुप तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
🗣️ इतकंच नाहीतर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.