इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात..

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जात असताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर त्यांच्या स्कॉर्पिओने धडक दिली. काल बुधवारी रात्री 8 :30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर शहरामधील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली.

परतूर तालुक्यामधील खांडवीवाडी गावामध्ये किर्तनासाठी जातांना साईनाथ कॉर्नरवर हॉटेल मधूबन समोर रस्ता ओलांडनाऱ्या एका ट्रॅक्टरला त्यांच्या स्कॉर्पिओ ने धडक दिल्याने हा अपघात झाला.

MH 12 TY 1744 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून इंदुरिकर महाराज प्रवास करत होते. या अपघातामध्ये महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड हा किरकोळ जखमी झाला आहे. सदरील अपघाताची माहिती मिळताच परतुर येथील पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.

जखमी चालक संजय गायकवाडला पोलिसांच्या साहाय्याने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर अपघात स्थळावरून इंदुरीकर महाराजांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी इथं पोहचवण्यात आलं असून खांडवीवाडी इथे त्यांचं कीर्तन नियोजित वेळेत पार पडलं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!