Scholarship 2022 विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये, शिंदे सरकारचा मोठा निर्णय; लाभ घेण्यासाठी करा अर्ज..
Scholarship 2022: शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक मोठे व उपयोगी उपक्रम राबवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल, पात्रता काय आहे, अर्ज कसा व कुठे करायचा याबाबत माहिती जाणून घेऊ या..
Scholarship 2022 या योजनेअंतर्गत ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये..
राज्यात उच्च तंत्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक आहेत. तसेच यामध्ये मुलींना देखील प्राधान्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार दरवर्षी उच्च तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देणारं आहे. यामुळे राज्यातील मुलींना चांगलाच फायदा होणार आहे.
अनेक विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. त्यासाठी शिंदे सरकारने दरवर्षी 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) प्रगती शिष्यवृत्ती योजनेमार्फत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून ही माहिती देण्यात आली.
ही शिष्यवृत्ती उच्च तंत्रशिक्षण म्हणजेच इंजिनिअरींग घेणाऱ्या मुलींना मिळणार आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात किंवा थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्यातील एकूण 5 हजार विद्यार्थ्यांनींना ही शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 624 विद्यार्थ्यांनींना ही शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. (Maharashtra Government Scholarship)
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय आहे या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
पात्रता बघण्यासाठी येथे क्लिक करा.
आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थ्यांनींनीकडे फी भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या उच्च तंत्रशिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक साह्य मिळत नसल्याने, शिक्षण अर्धवट सोडतात. यासाठी गरजू विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती फायद्याची ठरणार आहे. (Scholarship for Engineering Students in Maharashtra 2022)
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.