PMEGP Scheme in Marathi | मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी मिळणार 25 लाख कर्ज, असा करा अर्ज..
PMEGP Scheme in Marathi: तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण आणि आर्थिक पाठबळ मिळत नाही. अनेक प्रकारचे व्यवसाय जसे, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, टेलरिंग, किराणा दुकान, मसाला उद्योग, कुक्कटपालन, शेळी मेंढी पालन, इलेक्टॉनिक्स दुकाने, वीट बनवणे, गुऱ्हाळ, गॅरेज, मधमाशा पालन, शेतीपूरक उद्याेग इत्यादी.
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक पाठबळ मिळत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. मोदी सरकारची खास योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी लोन pmegp loan मिळणार आहे. या योजनेचं नाव पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत ‘प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना’ असं आहे. या योजनेअंतर्गत वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसायासाठी लोन pmegp loan मिळणार आहे.
देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.. या योजनेअंतर्गत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ही योजना तरुणांसाठी महत्वकांक्षी ठरली आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (PMEGP Scheme 2022)
pmegp loan किती कर्ज मिळणार..?
प्रधानमंत्री लघु उद्योग योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी 10 ते 25 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजेच व्यावसायिकांना या योजनेतून 25 लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे, काहीही तारण न ठेवता, व्यावसायिकांना हे स्वस्त कर्ज मिळणार आहे.. (PMEGP Scheme Loan)
PMEGP Scheme या व्यवसायासाठी कर्ज मिळणार..
- वन आधारित उद्योग
- खनिज आधारित उद्योग
- खादय क्षेत्र
- शेती आधारित
- अभियांत्रिकी
- रासायनिक आधारित उद्योग
- वस्त्रोद्योग (खादी वगळता)
- सेवा उद्योग
- अपारंपरिक ऊर्जा (PMEGP Yojana 2022)
PMEGP Scheme योजनेची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
अर्जदारचे वय 18 वय वर्षांपेक्षा जास्त असावे.
एखाद्या व्यक्तीने सरकारी संस्थेतून कोणत्याही कामाचे प्रशिक्षण घेतले असेल, तर त्याला या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल
या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करून अर्ज करा. (PMEGP Yojana in Marathi)
PMEGP Scheme आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला (अनुसूचित जाती जमातीचा असल्यास)
- नाहरकत व लोकसंख्या प्रमाणापत्र (PMEGP Scheme Documents Required)
कोरोना काळात अनेक छोटे-मोठे उद्योग-धंदे बंद पडले. त्याचा देशातील ‘एमएसएमई’ क्षेत्राला (लघु व मध्यम उद्योग) सर्वाधिक फटका बसला.. मोदी सरकारच्या या योजनेमुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊ या.. (PMEGP Loan Application Form)
pmegp online application असा करा अर्ज..
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम pmegp portal च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- आता गैर-वैयक्तिक लिंकवर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून घ्या.
- अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा. pmegp bank login
- अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज सादर करा.
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??