Builder Sanjay Biyani : बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा झाला उलगडा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर.

नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर नांदेड पोलिसांना यश मिळाले आहे. या हत्येच्या आरोपामध्ये पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.

दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना यश

५ एप्रिल २०२२ रोजी नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या केली. अखेर दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावण्यात यश आले आहे. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे समजत आहे. तसेच या हत्याकांडामागे कुख्यात गुंड रिंधाचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय बियाणी हत्ये-प्रकरणी तब्बल अडीच महिने तपासाची चक्रे फिरवत SIT प्रमुख विजय काबाडे यांच्या पथकाने पंजाबमधून एक तर नांदेडमधून सहा आरोपी ताब्यात घेतले आहेत. मात्र, संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील दोन मुख्य आरोपी अद्यापपर्यंत सुध्दा पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. उत्तर प्रेदशातील आरोपीवर सहा गंभीर गुन्हे दाखल असून हरियाणाच्या आरोपीवर तब्बल 13 हत्येचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड शहरामधील नाईक नगर येथील राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. ज्यात संजय बियाणी आणि वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा संजय बियाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ उडाली होती. नांदेड शहरातील गीता नगर परिसरात बियाणी हे आपली गाडी घरासमोर लावत असताना मोटारसायकलवर आलेल्या 2 हल्लेखोरांनी बियानी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या त्यानंतर तिथून पळ काढला होता. या घटनेमुळे गीता नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेमुळे व्यासायिकामध्ये भीतीचं पसरलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!