मोंढा नाका – आकाशवाणी सिग्नल यंत्रणा बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त..

औरंगाबाद : आज सोमवार दिनांक 20 जून रोजी दुपारी 4 वजेच्या सुमारास मोंढा नाका सिग्नल बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतूकिची ऐशी च्या तैशी झाली होती..

मोंधा नाकाच्या उड्डाण पुलाखालील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीचा खेळ खोळंबा होऊन तब्बल 1 किलोमिटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या..

तसेच आकाशवाणी येथील सिग्नल बंद करून बॅरिकेट्स लावण्यात आल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय. शिवाय सिग्नल बंद असल्यामुळे वाहने थांबत नसल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत कारवाई लागते. तसेच काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे नागरिक आकाशवाणी चौकातील सिग्नल सुरू करून बॅरिकेट्स काढण्याची मागणी करत आहे..

साभार : विशाल गाडे

पाहा आकाशवाणी चौकातील व्हिडिओ..
मोंढा नाका
मोंढा नाका
मोंढा नाका
मोंढा नाका उड्डाण पुलाखाली लागल्या वाहनांच्या रांगा..
मोंढा नाका सिग्नल बंद असल्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी..

आता तुम्ही सुद्धा ‘जर्नालिस्ट’..! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी ABD-news तर्फे हक्काचे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. तुम्ही पाठवलेली बातमी तुमच्या नावासहित प्रकाशित करण्यात येईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!