Government Scheme | शेतकऱ्यांना विहीर दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये, शिंदे सरकारची नवीन योजना
Government Scheme: शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेतीला मजा नाही. शेतकरी पाणी विहिरीद्वारे साठवतो. त्यानंतर मोटारच्या साहाय्याने वेळोवेळी पाणी देत असतो. पाण्याची साठवणूक करायचे म्हटले तर विहीर असणं आवश्यक आहे.
शेतीसाठी विहीर असणं आवश्यक आहे, यासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. (Sarkari Yojana Maharashtra) विहिरी संबंधित शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जुन्या झालेल्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
Government Scheme for Farmers अनेक शेतकऱ्यांची विहीर खराब झालेली असते आणि विहीर दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील जुन्या विहिरीची दुरुस्ती करता यावी, शिंदे सरकारने खास योजना राबविण्याचे ठरविले आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून योजनेमार्फत आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचं नाव ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana) असं आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टल मार्फत राबविली जात आहे. चला तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची पात्रता व अटी
या योजनेचा लाभ अनुसूचित व एससी समाजातील शेतकऱ्यांनाच मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 ते 1.50 लाखांपर्यंत असावे.
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान अर्धा एकर ते सहा हेक्टरपर्यंत जमीन असणं आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) सातबारा व 8अ उतारा
2) वार्षिक उत्पन्नाचा दाखला
3) सक्षम प्राधिकारीकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
4) विहीर असलेल्या जमिनीचा सर्वे/ गट नंबर, नकाशा व चतुर्सीमा
5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
6) विहिरीत पाणी असल्याचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा दाखला
7) गटविकास अधिकार्याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो
8) कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी दुरुस्त होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 50 हजार रुपये मदत मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्व आहे. या योजनेची माहिती पुढे नक्की शेअर करा.