अतिवृष्टी नुकसान भरपाई : जिल्हानिहाय यादी आणि नुकसान भरपाईची रक्कम..

शासन निर्णय :-

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण रु. 12,86,74,66,000 रुपये इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

मदत निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाला दिलेले आदेश खालीलप्रमाणे…

मदत निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.. संदर्भाधीन क्र. 2 येथील दि. 22/08/2022 च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. Reels

त्या वाढीव दरा-पैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 शासन निर्णयातील दराने मदत निधी प्रदान करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीच्या खर्चाची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा तसेच ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. Reels

सदरील आर्थिक मदत देताना केंद्र शासनाने पूर, चक्रीवादळ इ. नैसर्गिक आपत्तीसाठी विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करून राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मी. मी. पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील.

ही मदत देताना दि. 8/09/2022, दि.14/09/2022 व दि. 28/09/2022 च्या शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी विचारात घेऊन व्दिरुक्ती होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!