Farmer Electricity Connection | शेतकऱ्यांची शेतातील लाईट आता कापता येणार नाही, महत्वाचा निर्णय

Farmer Electricity Connection
Farmer Electricity Connection

मुंबई: शेतकरी हा अन्नदाता मानल्या जातो. कारण शेतकरी शेतीमध्ये विविध पिके घेऊन पिकवून साऱ्या जगाला अन्न पुरवतो. शेतकऱ्यांना हे करतं असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कारण कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा.. तर कधी कीड रोगामुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत असले की, शेतकऱ्यांची वीज कापली जाते. शेतकरी जगाला अन्न पुरवतो आणि शेतकऱ्यांचे असे हाल लावले, तर आपण खाणार काय आहे? वीज नसल्याने शेतकरी पिकांना पाणी कसं देईल? पिकांना पाणीपुरवठाचं नाही झाला तर पीक कसे येईल. शेतकरी यामुळे अगदी मेटाकुटीला आला आहे.

शेतकऱ्यांचे यामधील एक संकटं कमी होणार आहे, ते म्हणजे वीज संदर्भात.. (Farm Electricity Connection) शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य अन्न सुरक्षा आयोगाने मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही.

थकीत असलेल्या वीज बिलामुळे अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कापल्या जायची. यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी महावितरण विरोधात अन्नसुरक्षा आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने नुकताच निकाल दिला. आयोगाने महावितरणला तसा आदेश देखील दिला आहे.

आता शेतातील लाईट कधीच कापल्या जाणार नाही..
शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना, कुठल्याही शेतकऱ्याचे शेतातील लाईट कनेक्शन कापू नये, अशी सूचना अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणला दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmer Electricity Connection in Maharashtra)

Agriculture Electricity Connection in Maharashtra शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो शेतकऱ्यांचा अधिकारच आहे.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!