Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.

ई कॉमर्स वेबसाईट Amazon वर गुलाबी रंगाची एक प्लॅस्टिकची बादली विकण्यासाठी ठेवली आहे. बाजारात घ्यायला गेले तर ही बादली फार तर 200 ते 300 रुपयांना मिळेल., पण ‘अ‍ॅमेझाॅन’वर त्याची किंमत पाहून डोळे पांढरे होतील.

प्लॅस्टिकची बादली 26 हजार रुपयांना..,

‘Amazon ने या साध्या बादलीची किंमत 35,900 रुपये ठेवली असून त्यावर 28% सूट दिलेली असून, त्यानंतर ही बादली 25,999 रुपयांना विकण्यासाठी ठेवली आहे. तसेच ही बादली खरेदी करण्यासाठी लोकांना ‘ईएमआय’चा सुद्धा पर्याय दिला आहे. विशेष म्हणजे, इतक्या जास्त किमतीमध्ये ही बादली विकली सुद्धा जात आहे.

आधी अनेकांना नजरचुकीने या बादलीची किंमत चुकीची लिहिली गेली असावी, असं वाटलं, पण नंतर ही बादली खरंच 26000 रुपयांनी विकल्याचं समजल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. अनेकांना ही बाब खरी वाटत नव्हती.. एका ट्विटर युजरने या बादलीचा फोटो नि किंमत सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला..

सध्या समाज माध्यमांवर विवेक राजु याने शेअर केलेला हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ट्विटर युजर्स तर या स्क्रिनशॉटवर कमेंट आणि मिम्स तयार करून या बादलीच्या किमतीमुळे अमेझॉनला ट्रोल करत आहेत. एवढ्या महागड्या बादलीबरोबर एखादा मग तरी मोफत द्यायचा असं युजर्स म्हणत आहेत. त्यात या प्लॅस्टिक बादलीवर खरेदी रिव्ह्यूव देखील पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे अर्थातच नेटिझन्सला ट्रोलिंगसाठी आयत घबाड सापडलंय.

Similar Posts