Ayushman Bharat: आयुष्मान भारत कार्ड? मिळतात 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचे फायदे..
Ayushman Bharat : आरोग्य मंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकांकरिता आयुष्मान कार्ड जारी केले असून यामुळे कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मोफत मिळणार आहे.
मात्र अनेक जणांना याबद्दल माहिती सुद्धा नाहीये, जर आपण अजूनसुद्धा आयुष्मान कार्ड बनवलेले नाहीये तर अजूनही वेळ गेलेली नाहीय. मात्र, सर्वात अगोदर तुम्ही या आयुष्मान योजनेस पात्र आहात किंवा नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
अशी तपासा तुमची पात्रता
सर्वात प्रथम हे लक्षात घ्यावे की, आता आयुष्मान भारत योजनेचे नावात बदल करून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ असे करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार ठराविक पॅनेलमधील रुग्णालयांत अगदी मोफत मिळणार आहे. Ayushman Bharat
स्टेप 1
आयुष्मान कार्ड बनवायचे असल्यास त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही ते तपासले पाहिजे. पात्रता तपासण्याकरिता तुम्हाला आयुष्मान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmjay.gov.in वर जाऊन तपासावे लागणार आहे.
स्टेप 2
अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकल्यास तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे टाकावा. आता तुमच्यासमोर 2 पर्याय येतील, त्यातील एक पर्याय म्हणजे तुम्हाला तुम्ही राहत असलेले राज्य निवडायचे आहे.
स्टेप 3
तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचा आधरला लिंक असलेला मोबाईल क्रमांक बरोबरच रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल
या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यावर तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे समजेल.Ayushman Bharat
असे बनवावे आयुष्मान कार्ड
सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवाकेंद्रामध्ये जा.
तिथे असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला तुमचा आधारकार्ड, तुमचा रहिवासी दाखला, तुमचे शिधापत्रिका (ration card) आणि मोबाईल क्रमांकाची ही माहिती द्या.
- नंतर संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी करेल आणि तुमची पडताळणी पूर्ण झाल्यावर 10 ते 15 दिवसांत तुमचे आयुष्मान कार्ड तयार होईल.