PM Shri Yojana 2024: आता 14,500 शाळा होणार मॉर्डन, शिक्षण होणार स्मार्ट, जाणून घ्या सविस्तर!

PM Shri Yojana 2024: मुलांच्या शिक्षणाला स्मार्ट शिक्षणाची जोड देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जुन्या शाळांना एक नवे रूप मिळणार आहे. PM Shri Yojana असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. पंतप्रधान श्री योजनेंतर्गत देशभरातील 14500 शाळांना विकास आणि नवीन मॉडेलशी जोडण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व शाळांमध्ये या योजनेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ देशातील तब्बल 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढले आहे. मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पंतप्रधान श्री योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

 PM Shri Yojana 2024
PM Shri Yojana 2024

PM Shri Yojana ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. सरकार देशातील 14500 हून अधिक शाळा या योजने मार्फत विकसित करणार आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची अगदी व्यवस्थित काळजी सुद्धा घेतली जाणार आहे. या सोबतच या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण उपलब्ध करण्यात येईल आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य पायाभूत सुविधा सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे, जेणेकरून मुलांना अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. या योजनेच्या साहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आधारे जोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे शालेय शिक्षणाचा दर्जा अजूनच सुधारला जाणार आहे.

PM Shri Yojana 2024 Benefits

  • PM Shri Yojana मधून 14500 पेक्षा जास्त मॉडेल स्कूल निर्माण करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि शालेय गोष्टींची विस्तृत श्रेणी देण्यात येईल. या शाळांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जातील जेणेकरून मुल लक्ष देऊन त्यांचा अभ्यास करू शकतील.
  • या योजने अंतर्गत शाळांचा केवळ विकासच केला जाणार नाही तर 21 व्या शतकातील प्रमुख स्किल्स सुद्धा या शाळेद्वारे मुलांना शिकवण्यात येतील. ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
  • या शाळांना रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आणि उत्तम रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेक्टर स्किल सोबत ही जोडले जाणार आहे.
  • 18 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मूलभूत स्तरापासून समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी योग्य सुविधा सिस्टम लागू केली जाईल.

27,360 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी | Budget of 27,360 crore

जसे की आपण पाहिलेच, PM Shri Yojana ही केंद्र पुरस्कृत योजना असून, या योजनेच्या अंतर्गत शाळांच्या अपग्रेडेशनचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार द्वारे केला जाणार आहे. सोबतच या योजनेची अंमलबजावणी करण्याची आणि देखरेख करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असणार आहे. शाळांचा विकास आणि दर्जावाढीसाठी या योजनेच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेमुळे फायदा होणार आहे. येत्या 5 वर्षांत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तब्बल 14,500 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत, ज्यासाठी एकूण 27,360 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.

पीएम श्री शाळा ठरणार भविष्यकालीन बेंचमार्क | Future Benchmark

भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान श्री योजना 2024 लाँच करण्याची घोषणा जूनमध्ये केली होती, ज्या बद्दलची सविस्तर माहिती पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त जारी केली होती. देशभरात नवीन एज्युकेशन सिस्टम या योजनेअंतर्गत सुरू केली जाईल, जेणेकरून सर्व विद्यार्थ्याला चांगल्या आणि आधुनिक शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान श्री योजना ही येणाऱ्या नवीन पिढीला योग्य ज्ञान आणि कौशल्यांशी जोडून तसेच सरकारी शाळांना स्मार्ट स्कूल बनवून भविष्यामधील बेंचमार्क मॉडेल स्थापित करण्याच्या उद्देशाने राबविली जात आहे.

सर्वसामान्य आणि गरीब मुलांनाही मिळणार मॉडर्न शिक्षणाची संधी | Modern Education

आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी पुढे सांगितले की, देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये कमीत कमी एक पीएम श्री शाळा स्थापन करण्यात येईल, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी PM Shri Yojana योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. यासोबतच सर्वसामान्यांची मुले आणि गरीब नागरिकांची मुले सुद्धा या स्मार्ट शाळांमधे शिकून चांगल्या आणि आधुनिक शिक्षणाचा लाभ घेऊ शकतील. या सोबतच या योजने मार्फत देशातील प्रत्येक माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळा सर्व मुलांना लाभ देण्यासाठी एकत्र जोडण्यात येतील.

पंतप्रधान श्री योजनेसाठी शाळांची नोंदणी आणि निवड प्रक्रिया | Registration and Selection Process

  • या योजनेचा भाग होण्यासाठी सर्वात आधी शाळांना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे.
  • प्रत्येक वर्षी, प्रत्येक तीन महिन्यांनी शाळांसाठी ही वेबसाइट ओपन केली जाणार आहे, त्यावेळी शाळांना आपली नोंदणी करता येऊ शकते.
  • त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या एका टीम कडून या शाळांची तपासणी केली जाईल आणि नंतर त्या शाळेशी संबंधित संपूर्ण अहवाल तयार करून पुढे पाठवण्यात येईल.
  • तुमच्या शाळेची जर यामधे निवड झाली तर तुमच्या शाळेचे आधुनिकिकरण करण्यात येईल.
  • या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊ शकता.

One thought on “PM Shri Yojana 2024: आता 14,500 शाळा होणार मॉर्डन, शिक्षण होणार स्मार्ट, जाणून घ्या सविस्तर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!