आजपासून सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका.
बँक सुरू होण्याच्या वेळेत बदल होणार आहे. आज दिनांक 18 एप्रिल 2022 म्हणजेच सोमवारपासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहेत.
पूर्वी बँका 10 वाजेपासून सुरू होत होत्या. म्हणजेच आजपासून बँका दररोज एक तास लवकर चालू होणार आहेत. बँका बंद करण्याची वेळ मात्र तीच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये.
सोमवार 18 एप्रिल 2022 पासून बँक एक तास आधी सुरू करण्याचा आदेश भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देण्यात आला होता. त्याआदेशा नुसार आता बँका आजपासून सकाळी 10 ऐवजी 9 वाजता सुरू होणार असून RBI च्या या नवीन नियमाचा सर्वसामान्य लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे.
नोकरदार वर्गाला फायदा
RBI ने बँकांना दिलेल्या या आदेशाचा जास्त फायदा हा नोकऱ्या करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. साधारणपणे कामावर जाण्याची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी असते. तसेच रविवारी सुटी असते. त्यामुळे बँकेमध्ये एखादे काम असेल तर त्यासाठी खास सुटी काढून ते काम करावे लागायचे. आता बँका या सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे कामावर जाण्यापू्र्वी आपले बँकेतील कामे करून कामावर जाणे शक्य होणार आहेत.
कॅश विड्रॉलचा नवा नियम
या बरोबरच RBI कडून आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना लवकरच देशातील सर्वच बँकांच्या ATM वर कार्डलेस नगद काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हणजेच तुम्ही आता डेबिट कार्डचा उपयोग न करता सुद्धा आता ATM मधून पैसे काढू शकणार आहात. आणि ही सर्व यंत्रणा UPI सिस्टिमवर काम करणार आहे.