पांढऱ्या दुधाचा काळा धंदा उघड..! कशाप्रकारे बनवत होते केमिकलचे दुध पाहा..

केमिकलयुक्त दूध पिल्याने पोटदुखी, उलट्या होणे सारखे विकार बळकवतात. आतड्यांवर सूज येऊ शकते. रोग प्रतिकारशक्ती कमी होते. आणि जास्त प्रमाणात असे केमिकलयुक्त दूध पिल्याने जिवावरही बेतू शकते.

आपल्याकडे शेतकऱ्यांमार्फत येणारे किंवा पिशवीमधील पॅकिंग दुध केमिकलयुक्त नसेल याचीही खात्री आता उरली नाही. असाच पांढऱ्या दुधाचा काळा धंदा बीड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

पाटोदा तालुक्यामधील नागेशवाडीत दुधाच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. पण, हे तर खूपच छोटे प्रकरण असून संपूर्ण राज्यभरात असे रॅकेट सक्रीय आहे.

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकामधील पाेलिसांनी मारलेल्या छाप्यात रसायनपासून तयार केलेले तब्बल 160 लिटर दूध, पावडर असे एकूण 49 हजारांचे साहित्य जप्त केले असून आरोपी अप्पासाहेब हरिभाऊ थोरवे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी महादेव गायकवाड यांनी काल शुक्रवारी पाटोदा पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिसांनी जप्त केलेले ते केमिकल युक्त बनावट दूध व मुद्देमाल हस्तगत केला. जप्त केलेल्या दुधाचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागेशवाडीत आरोपी अप्पासाहेब थोरवे हा बनावट दुधाची पावडर व केमिकलच्या साहाय्याने दूध तयार करत होता. केमिकलच्या साहाय्याने तयार केलेले दूध गायी व म्हशीच्या दुधात मिसळून डेअरीवर विक्री करत होता. अप्पासाहेब अगोदर पाण्यात मिल्क पावडर मिसळायचा. नंतर त्या मिश्रणात ग्लुकोज टाकायचा व त्यापासून बनवलेले दूध चोरीने विक्री करायचा. हे दूध आरोग्यास हानिकारक असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, पोलिस नाईक आशा चौरे यांनी ही कारवाई केली.

दूधमधली भेसळ कशी ओळखावी..

सर्व प्रथम, दुधात पाण्याची भेसळ तपासण्यासाठी, लाकडावर किंवा दगडावर दुधाचे एक-दोन थेंब टाका. जर दूध वाहत जाऊन तळाशी पडले आणि त्यावर पांढरा डाग निर्माण झाला तर दूध पूर्णपणे शुद्ध आहे.

दुधात डिटर्जंटची भेसळ शोधण्यासाठी, काचेच्या कुपीमध्ये काही प्रमाणात दूध घ्या आणि ते जोमाने हलवा. दुधाला फेस येऊ लागल्यास या दुधात डिटर्जंट मिसळले जाते. हा फेस जास्त काळ तसाच राहिला तर ते दूध बनावट आहे यात शंका नाही.

दुधाचा वास घ्या. दूध नकली असेल तर त्याला साबणासारखा वास येतो आणि दूध खरे असेल तर तसा वास येत नाही.

दूध दोन्ही हातांनी चोळण्याचा प्रयत्न करा. जर दूध खरे असेल तर सामान्यतः स्निग्धपणाची भावना नसते. पण जर दूध नकली असेल तर ते घासल्याने डिटर्जंट घासताना वंगण मिळते.

दूध जास्त काळ ठेवल्यास खऱ्या दुधाचा रंग बदलत नाही. जर दूध बनावट असेल तर काही वेळाने ते पिवळे पडू लागते.

खऱ्या दुधाला उकळताना त्याचा रंग अजिबात बदलत नाही, पण उकळल्यावर नकली दुधाचा रंग पिवळा होतो.

सिंथेटिक दुधात युरिया मिसळल्यास त्याचा रंग गडद पिवळा होतो.

चवीच्या बाबतीत, खऱ्या दुधाला किंचित गोड चव असते, तर डिटर्जंट आणि सोडा मिसळल्यामुळे बनावट दुधाची चव कडू होते.

Similar Posts