pm surashka bima yojana | वर्षाला २० रुपये भरून, २ लाखांचा विमा.. मोदी सरकारची भन्नाट योजना

सरकारच्या योजनेच्या पाॅलिसीतून नागरिकांना नेमके कोणते लाभ होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबाबत | about pm surashka bima yojana
pm surashka bima yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दुर्घटना झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य दिले जाते. यामध्ये ऑटो डेबिटमार्फत प्रीमियमची रक्कम एक जून रोजी तुमच्या खात्यातून कट होते. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वैधता पुढील वर्षी 31 मे पर्यंत असते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दुर्घटना झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या योजनेमार्फत 2 लाख रुपये दिल्या जातात. नागरिकांची गरज लक्षात ठेवून ही योजना सुरू केली आहे. ‘PM Surashka Bima Yojana Maharashtra’
या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला मृत्यू, अपघात आणि अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाते. जर आत्महत्या केली तर या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. परंतु हत्येमुळे मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत विमा सुरक्षा दिल्या जाईल. तसेच एक हात किंवा एक पाय गमावला, तर कोणतीही मदत या पॉलिसीअंतर्गत मिळणार नाही.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 18 ते 70 वर्षें वयोगटातील असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक बचत खाते असल्यास तुम्ही फक्त एक बचत बॅंक खाते वापरून योजनेची सदस्यता घेऊ शकता. (Pradhan Mantri Surashka Bima Yojana Marathi)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अर्ज
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या पॉलिसीमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
हे देखील वाचा-
- शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ
- शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला नुकसान भरपाई मिळणार, 3600 कोटी निधी मंजूर.
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा