Cibil Score Increase To Get Loan : सिबिल स्कोर कमी झाल्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले का? ‘या’ 5 टिप्स वापरून वाढवा तुमचा सिबिल..

Cibil Score Increase To Get Loan : सिबिल स्कोर कमी झाल्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाल्यास ‘या’ सोप्या टिप्स वापरून वाढवता येईल तुमचा सिबिल स्कोअर..

Cibil Score Increase To Get Loan

Cibil Score Increase To Get Loan

1- कर्जाचे हप्ते वेळेवर भरा ( Pay the loan installments on time)–

एखाद्यावेळेस तुम्ही एखाद्या बँक अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले असल्यास वेळेवर त्याची परतफेड करणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही जर का कर्जाचे हप्ते वेळेवर भरत नसाल तर विपरीत परिणाम तुमच्या Cibil Score वर होण्याची दात शक्यता असते. यासाठीच तर तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर परत करणे हे तुमच्या क्रेडिट स्कोर (Credit Score) वाढवण्याकरता अत्यंत महत्त्वाचे आहे. (Cibil Score Increase To Get Loan)

2- कर्जाच्या हप्ते भरायला वेळ करू नये (Do not delay paying the loan installments)–

तुम्ही हप्त्यावर घर अथवा वाहन खरेदी केलेली आहे तर तुमचे जे कर्जाचे EMI वेळेवर भरणे खूपच आवश्यक आहे. नसता त्याचा दुष्परिणाम तुमच्या Cibil Score वर होतो. तारखेलाच EMI भरला तर तुमचा सिबिल स्कोर वाढायला मदत होते. (Cibil Score Increase To Get Loan)

Tata Nexon को कडी टक्कर देने 25 सुरक्षा फीचर्स के साथ लॉंच हुई ये एसयूव्ही

3- वारंवार सिबिल स्कोर तपासावा आणि काही चुका असतील तर दुरुस्त कराव्यात (Check the CIBIL score frequently and correct any mistakes)–

तुमचा सिबीलचा रिपोर्ट तपासणे खूप गरजेचे आहे. जर का तुम्हाला यात काही चुक दिसून आली तर लवकर सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्यावेळेस आपण कर्जाची परतफेड केलेली असते, पण ते Loan Account बंद करायला आपण विसरतो. त्यामुळे देखील तुमच्या सिबिल स्कोरवर नकारात्मक प्रभाव पडतो. यासाठी तुमच्या कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यावर तुम्ही ते loan account बंद करणे गरजेचे आहे. (Cibil Score Increase To Get Loan)

4- एखाद्याच्या कर्जाला जामीनदार किंवा गॅरेंटर होऊ नये (One should not become a surety or guarantor for one’s debt)–

काही वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्याकरिता जामीनदार म्हणजेच गॅरेंटर असतो. पण त्या व्यक्तीने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही तर त्याचा सुद्धा नकारात्मक परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर 100% होतो. समजा त्या व्यक्तीने जर घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही अन् तो डिफॉल्टर झाला तरी सुद्धा तुमचा Credit score झपाट्याने कमी होतो. यासाठी एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी गॅरेंटर होण्याचे टाळणे हे काही वेळेस तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

5- क्रेडिट कार्ड वरच्या लिमिटच्या 30 टक्केच खर्च करावा (Spend only 30 percent of credit card upper limit)–

जर तुम्ही credit card वापरत असाल तर त्या कार्डवर जो काही लिमिट देण्यात आला आहे त्या लिमिटच्या केवळ 30 % वापरावे आणि तेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ऑन जर तुम्ही 30 टक्क्यांपेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम तुमच्या सिबिलवर हमखास होतो.

शिवाय credit card बिल भरण्याची जी सायकल असते ती होण्यापूर्वीच क्रेडिट कार्डचे बिल भरावे. वेळेत क्रेडिट कार्डचे बिल वेळेच्या आत भरले तरी सुद्धा तुमचा सिबिल स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!