उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..

औरंगाबादच्या गारखेडा परिसरामधील सूतगिरणी येथील दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टीमध्ये मावशीच्या घरी आले होते. सोमवारी दिनांक ३० पाचपीरवाडी ता. गंगापूर शिवारामधील शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे वय १५ वर्षे आणि सोहिल संतोष काळे वय १३ वर्षे अशी मृत्यू पावलेल्या भावांची नावे आहेत.

औरंगाबाद शहरामधील गारखेडा भागातील सूतगिरणी येथे इयत्ता नववीमध्ये शिकणारा स्वप्नील काळे व आठवीमध्ये असलेला साहिल काळे हे दोन्ही सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टीमध्ये काका संजय नरवडे यांच्याकड आले होते.

दरम्यान, काका व मावशी हे शेतात आले असताना पोहता येत असलेला मावसभाऊ आणि हे दोन्ही भाऊ पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. स्वप्नील व साहिल या दोघांना पोहता येत नसल्यामुळे ते शेततळ्यात ठिबकची नळी धरून पोहत असतानाच ठिबकची नळी तुटली आणि मावसभावाने त्यांना बुडताना बघितले आणि जोराने ओरडला परंतु जवळपास कोणी नसल्याने त्याचा कोणीही आवाज ऐकला नाही. दरम्यान स्वप्नील व सोहिल या दोन्ही दुर्दैवी भावंडचा बुडून मृत्यू झाला.

मृत स्वप्नील संतोष काळे आणि सोहिल संतोष काळे

शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार संतोष पवार, पोलीस मित्र बाबा शेख यांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील उधलसिंग जारवाल राजपूत यांच्या साहाय्याने दोन्ही भावांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!