भयंकर ! पती-पत्नीचा वाद अन् मुलीचा झाला घात, संतापलेल्या बापाने एक वर्षीय मुलीला जिवंत पुरले

वाशिम (𝐀𝐁𝐃𝐧𝐞𝐰𝐬): वाशिम जिल्ह्यातून राज्याला हादरवणारी घटना समोर. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने क्रूर कृत्य केलं आहे.

नवरा बायकोच्या भांडणानंतर क्रूर पित्याने एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरून तिचे प्राण घेतल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील वाडीवाकद शेतशिवारात घडली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीमधील भांडण कोणत्याही थराला जाईल याचा अंदाज न केलेलाच बरा..! अनेकदा या भांडणाचा शेवट धक्कादायक होतो. वाशिममध्ये एका निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला खड्ड्यात जिवंत पुरल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली असून या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 27 वर्षीय सुरेश घुगे असे क्रूर वडिलांचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सुरेश घुगे हे पत्नी कावेरीसोबत वाडी वाकड मळ्यातील शेतात राहत असून त्यांना तीन मुली होत्या.

सुरेश घुगे हा नेहमी पत्नी कावेरी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. काल दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली, त्यात सुरेशने पत्नीला बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी कावेरी गावाकडे धावली. दरम्यान सुरेश घुगे यांनी आपला सर्व राग 1 वर्षीय लक्ष्मी घुगे या मुलीवर काढला. त्याने शेतात एक खड्डा खोदला आणि त्या खड्डयात लक्ष्मीला जिवंत शेतातील पुरले आणि तिचे प्राण घेतले.

यानंतर काही लोक शेतात गेले असता त्यांना लक्ष्मी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी सुरेशला विचारणा केली असता त्याने चिमुकलीला जिवंत पुरल्याचे सांगितले. यानंतर गावकऱ्यांनी मिळून मुलीचा बाहेर काढले पण तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी रिसोड पोलिसांना माहिती दिल्यावर रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व आरोपी सुरेशला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!