e shram card yojana maharashtra | ई-श्रम कार्डधारकांना महिन्याला मिळतंय 3000 रुपये पेन्शन, त्यासाठी करा नोंदणी
e shram card yojana maharashtra: केंद्र सरकार व राज्य सरकार नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार तरुण, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी घेऊन येत आहे. तसेच केंद्र सरकारची ही ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागे असंघटित वर्गाला आर्थिक मदत द्यावी हाच उद्देश आहे.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल लॉन्च केलेलं आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर कामगाराला ई-श्रम कार्ड (e shram card) दिलं जाते.
येथे क्लिक करून काढा ई-श्रम कार्ड
e shram card yojana 2022 ई-श्रम कार्ड योजनेचे अनेक फायदे सरकार तुम्हाला देत आहे. हे कार्ड असंघटित कामगारांना दिलं जाते, हे आपण लक्षात घ्यावे. या कार्डमुळे भविष्यात अजून लाभ वाढतील. ई-श्रम कार्ड योजनेविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
ई-श्रम कार्ड योजनेबाबत
पात्रता :
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ज्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगार ई-श्रम कार्ड करिता अर्ज करू शकतात.
ई-श्रम कार्डसाठी वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार ई-श्रम कार्ड काढू शकतो. ‘e shram card information in marathi’
येथे क्लिक करून काढा ई-श्रम कार्ड
e shram card benefits in marathi ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ
ई-श्रम कार्ड धारकांना सरकारकडून दरमहा 500 ते 1000 रुपये लोकांच्या बँक खात्यात पाठवले जातात.
ई-श्रम कार्ड तुमच्याकडे असेल तर पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळेल.
एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम दिल्या जाते.
त्याचबरोबर त्या व्यक्तीला अपंगत्व असल्यास 1 लाख रुपये मिळतात.
तसेच घर बांधण्यासाठी या ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत पैसे दिले जातात.
ई-श्रम कार्डधारकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
भविष्यात याला रेशनकार्ड लिंक केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला देशातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळेल. e shram card in marathi
ई-श्रम कार्ड योजना महत्वाचा लाभ
ई-श्रम कार्ड योजनेत 18 ते 40 वर्षांमध्ये सहभागी होऊ शकतो. लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षांपर्यंत या योजनेत योगदान द्यावे लागेल. 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर , लाभार्थ्यांला प्रत्येक महिन्याला खात्रीशीर 3,000 रुपये पेन्शन दिल्या जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
येथे क्लिक करून काढा ई-श्रम कार्ड
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज