Flying Bike | जगातील पहिली हवेत उडणारी बाइक बाजारात आली, एवढी असेल किंमत
Flying Bike: हवेत विमान, हेलिकॉप्टर तुम्ही पाहिलं असेल.. परंतु कधी हवेत उडणारी बाईक पाहिली नसेल किंवा ऐकलं सुद्धा नसेल.. आता हवेत उडणारी मोटारसायकल आली आहे. ही मोटरसायकल खरंच हवेत उडणारी आहे. या हवाई बाइकची बुकिंग देखील सुरू आहे.
अमेरिकेतील जेटपॅक एव्हिएशन (American Jetpack Aviation) कंपनीने हवेत उडणारी ही माेटरसायकल बनवली आहे. या बाईकमध्ये 8 टरबाइन्स आहेत. या इंजिनमुळे ही बाईक 30 मिनिटांत 96 किलोमीटरचा प्रवास करू शकते. या हवाई बाईकची अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
हवेत उडणाऱ्या या बाइकचे नाव आहे ‘स्पीडर’.. या माेटरसायकलमध्ये 4 टरबाईन्स हाेते. परंतु, अंतिम उत्पादनात 8 टरबाईन्स राहणार आहेत, असे सांगण्यात आले. या बाइकची 136 किलो ते 250 किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे. flying bike information in marathi
या बाइकची स्पीड प्रति घंटा 400 किलोमीटर पेक्षा जास्त असेल. ही बाईक 16,000 फीट उंच उडू शकते. परंतु, एवढ्या उंचीवर जाण्यासाठी इंधन संपून जाईल. इंधन संपल्यावर तुम्ही म्हणाल कसे करायचे? तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये पॅराशूट असेल जे तुम्हाला जमिनीवर सुरक्षित वापस आणेल.
flying bike in india या हवाई बाकमध्ये व्हिडिओ गेमिंग सारखा कंट्रोल सिस्टीम असणार आहे. सुरक्षेसाठी या बाइकमध्ये कंट्रोलिंग युनिटमध्ये सेन्सर्सचा वापर केला गेला आहे. या बाईकची बुकिंग सुद्धा चालू झाली आहे. अशी ही हवाई बाइक असणार आहे. american aviation company bike
flying bike price हवाई बाईकची किंमत:- या हवाई बाईकची 3.15 काेटी एवढी किंमत आहे. या बाइकला 2 ते 3 वर्षात बाजारात आणल्या जाईल.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज