Gram Panchayat Yojana: खुशखबर! ग्रामपंचायतीच्या योजनांवर 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ..

Gram Panchayat Yojana:

राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 कृषी विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या योजनेवर 100 टक्के अनुदान देण्यात येतं आहे. राज्यातील सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
Gram Panchayat Yojana

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामपंचायतीच्या योजनेवर 100 टक्के अनुदान देण्यात असून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पात्र रहिवाशांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मागेल त्याला काम देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

यावर मिळणार 100 टक्के अनुदान
फळबाग/फुलपिके लागवड
व्हर्मी कंपोस्ट
नाडेप कंपोस्ट
शेततळे

अनुदान रक्कम


महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत. अनुदानाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येतो.
व्हर्मी कंपोष्ट – 11 हजार रुपये – 944 प्रति युनिट नाडेप, कंपोष्ट – 10 हजार रुपये – 537 प्रति युनिट
शेततळे – आकारानुसार 60 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत
फळबाग/ फुलपिके – जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत प्रति हेक्टर (mgnrega maharashtra)

योजनेत अंतर्भूत फळपिके/ झाड
फळपिके – आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, बोर, नारळ, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, फणस, अंजीर, शेवगा, केळी, ड्रॅगनफ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प, द्राक्ष, पानपिंपरी, चंदन, खाया, निम, चारोळी, बाभूळ, महोगनी, अंजन, खैर, ताड, सुरु, रबर, महारुख, मॅंजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनर, शिरिष, बांबू व औषध वनस्पती इत्यादी.

फुलपिके – गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा इत्यादी.

योजनेत अनुदानातील अंतर्भूत बाबी


जमीन तयार करणे, खड्डे तयार करणे, कांड्या/ कलमांची बिले व नांगी भरणे, खत देणे, आंतरमशागत, पिक संरक्षण व पाणी देणे इत्यादी. (nrega yojana maharashtra)

योजनेची पात्रता
अर्जदाराकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबे, कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, तसेच अल्पभूधारक घेऊ शकतो.
अर्जदाराची जमीन जास्तीत 2 हेक्टरपर्यंत असावी. (Gram Panchayat Yojana 2022 Maharashtra)

आवश्यक कागदपत्रे
7/12 व 8अ उतारा
आधार कार्ड
बॅंक पासबुक
जॉब कार्ड

येथे करा अर्ज..


अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील ग्रामपंचायत मध्ये जावं लागेल. वरील दिलेली कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत मध्ये अर्ज करा. (Gram Panchayat Yojana Marathi)

योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेची माहिती जाणून घेता येईल.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!