PM Kisan Yojana Online Correction: पीएम किसान योजनेत अशी करा दुरुस्ती..
PM Kisan Yojana Online Correction: शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्यात 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात..आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता वर्ग होणार आहे.
केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर जमा करत असते. पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. आता शेतकरी 12व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. (PM Kisan Yojana 2022)
पीएम किसान योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ‘ई’-केवायसी’चा निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेत ‘ई-केवायसी’ केलेलं नसेल, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. ई-केवायसी कशी करायची हे जाणून घेऊ या..
अशी करा ‘ई-केवायसी’ PM Kisan Yojana Online Correction
सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
आता ‘फार्मर कॉर्नर’वर (Farmer Corner) क्लिक करुन ‘ई-केवायसी’ या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’ येईल.
‘ओटीपी’ टाकल्यानंतर पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ पूर्ण होईल. (PM Kisan Yojana eKYC)
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना काही ठिकाणी चूक होते, ही चूक नंतर लक्षात येते. या चुकीमुळे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा होऊ शकत नाही. तर पीएम किसान योजनेत चुका ऑनलाईन दुरुस्त कसे करायचे जाणून घेऊ या..
पीएम किसान योजना ऑनलाईन करेक्शन
सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर जा.
उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक ‘Edit Aadhar Details’ या पर्यायावर करा.
नवीन पृष्ठावर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून ‘सर्च’ वर क्लिक करा.
तुम्ही नोंदणी केलेली संपूर्ण मिहिती स्क्रीनवर दिसेल. तिथेच ‘Edit’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
नंतर नाव, तालुका, जिल्हा व आधार क्रमांक जिथे काही चूक असेल ती दुरुस्त करून घ्या.
सर्वात शेवटी ‘अपडेट’ वर क्लिक करा. (PM Kisan Yojana Online Correction in Marathi)
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा.. PM Kisan Yojana Online Correction
पीएम किसान टोल फ्री नंबर – 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन नंबर – 155261
पीएम किसान लॅंडलाईन नंबर – 011-23381092, 23382401 (PM Kisan Yojana Helpline Number Maharashtra)
पीएम किसानची नवीन हेल्पलाईन नंबर – 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन नंबर – 0120-6025109
ई-मेल आयडी – [email protected]
हे देखील वाचा-
- पोस्ट विभागात 1 लाख जागांसाठी मोठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज
- घरबसल्या एका क्लिकवर मिळवा 35 लाख; जाणून घ्या कोणाला मिळू शकते कर्ज