राशीभविष्य 15 डिसेंबर : Horoscope Today

Horoscope Today:

🐏 *मेष / Aries :*
आज तुमच्या सर्व समस्या विसरून कामात लक्ष द्यायला हवे. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वायफळ खर्च टाळा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – लाल.

🦬 *वृषभ / Tauras :*
आज असे काही तरी घडेल की ज्यामुळे तुमच्या जीवनात एक मोठा बदल होऊ शकतो. व्यवहार करताना काळजी घ्या. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. दूरचा प्रवास लवकरच होईल. धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग – पांढरा.

👩‍❤️‍👨 *मिथुन / Gemini :*
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप रोमांचक असा असेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. नव्या कार्याची सुरुवात आज करु शकता. नवी गाडी खरेदी करण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग – हिरवा.

🦀 *कर्क / Cancer :*
आज तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. मित्रांसोबत वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार कराल. आजचा शुभ रंग – निळा.

🦁 *सिंह / Leo :*
कुटुंबात छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 5 हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

👧🏻 *कन्या / Virgo :*
आज अनेक अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. वाद विवाद टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – सोनेरी.

⚖️ *तूळ / Libra :*
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवेल. त्यामुळे आज तुम्ही आराम कराल. अचानक मित्रांसोबत एखाद्या ट्रिपवर जाण्याचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग – लाल.

🦂 *वृश्चिक / Scorpio :*
कामात किंवा व्यवसायात आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – जांभळा.

🏹 *धनु / Sagittarius :*
कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. सायंकाळी 4.15 ते 5.15 हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजचा शुभ रंग – जांभळा आणि केशरी.

🦐 *मकर / Capricorn :*
नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. श्री गणेशाची पूजा करा. गरीबांना अन्न, कपडे दान करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

🍯 *कुंभ / Aquarius :*
हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण करा. काम पूर्ण न झाल्यास बॉस नाराज होऊ शकतो. दूरच्या नातेवाईकांचे घरी आगमन होऊ शकते. कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होईल. आजचा शुभ रंग – लाल आणि हिरवा.

🦈 *मीन / Pisces :*
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत बैठक होईल. यामुळे तुम्हाला चांगले काम करण्याचं मार्गदर्शन मिळेल. व्यापारात चांगली प्रगती होईल. कर्ज घेतले असल्यास ते लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग – नारंगी.

Similar Posts