Sanchar Saathi Portal : मोबाईल चोरी किंवा हरवण्याची काळजी नको! सरकारच्या Sanchar Saathi Portalच्या मदतीने लगेच शोधता येणार…!
Sanchar Saathi Portal : हल्ली मोबाईल चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून स्मार्टफोन हरवला अथवा चोरीला गेला तर त्यामध्ये असलेला वैयक्तिक डेटा लीक होण्याची चिंता ही सर्वात मोठी असते. मात्र आता काळजी नको, कारण सरकारच्या Sanchar Saathi Portal मुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईलचा शोध घेणे शक्य आहे…
चला तर मग जाणून घ्या Sanchar Saathi Portalचा वापर कसा करावा?
जर का तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल, तर तो ब्लॉक करण्याकरिता आणि मोबाईलला ट्रॅक करिता तुम्ही Sanchar Saathi Portal चा उपयोग करू शकता. यासाठी सर्वात पाहिले तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागेल. त्या कंप्लेंट नंबरच्या साहाय्याने सरकारच्या संचार साथी या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यावर तुम्हाला एक Tracking Number मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गहाळ झालेल्या मोबाईलचे स्टेटस ट्रॅक करू शकतात. शिवाय, तुमचा मोबाईल परत मिळाल्यावर तुम्ही संचार साथी या पोर्टलचा वापर करून मोबाईलला अनब्लॉक सुद्धा करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही sanchar saathi portal चा उपयोग करू शकता.
मोबाईल हरवल्यास अथवा चोरी झाल्यास कसा ब्लॉक करालं?
- संचार साथी या पोर्टलवर हरवलेल्या तुमच्या मोबाईलची तक्रार नोंदवण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला https://sancharsaathi.gov.in/ या लिंकद्वारे अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- नंतर होमपेजच्या Citizen Centric Services या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला तुमच्या हरवलेला/चोरलेला मोबाईलला ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल.
- Block Your Lost mobile या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
- तुम्हाला हा फॉर्म काळजीपूर्वक भरून नंतर मोबाइल क्रमांकासह IMEI नंबर नमूद करा.
- नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मॉडेल नंबर, मोबाइल खरेदी केल्याचे बिल सुद्धा अपलोड करने गरजेचे आहे.
- यानंतर तुम्हाला मोबाईल हरवल्याची/चोरीला गेल्याचा दिनांक, वेळ, जिल्हा बरोबरच राज्याची माहिती नमूद करावी लागेल.
- याबरोबरच तुम्हाला FIR ची प्रतही जोडावी लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच तुमचे नाव, Email id, पत्ता ही माहिती द्यावी लागेल.
- नंतर डिस्क्लेमर निवडून फॉर्म सबमिट करावा.
- फॉर्म सबमिट केल्यावर तुमच्या मोबाईलला ब्लॉक करण्यात येईल.
शिवाय, तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत हे देखील तुम्ही संचार साथी या पोर्टलवर शोधू शकता.
तक्रार करण्यासाठी हे लक्षात ठेवा
जर तुमचा मोबाईल हरवला/चोरीला गेला असेल तर तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी IMEI नंबर असणे आवश्यक आहे.
कसा शोधावा IMEI नंबर?
तुमच्या मोबाईलच्या डायल पॅड वर *#06# हा नंबर प्रविष्ठ करताच मोबाईलच्या स्क्रीनवर तुमचा IMEI नंबर दिसेल. या नंबरला कोठेतरी लिहून ठेवा…