राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने सौम्य कलमे, पुढील काळात गरज पडण्याची शक्यता, जलील यांचा आरोप.
प्रक्षोभक वक्तव्य आणि चिथावणीखोर भाषण केल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यामुळे राज ठाकरेंवर सौम्य कलमे लावण्यात आले आहेत.
राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु राज ठाकरेंना जामीन मिळेल अशी सौम्य कलमे लावण्यात आली आहेत. असे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राणा दाम्पत्यावर केवळ हनुमान चालीसा पठण करण्याच्या इशाऱ्या वरुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मग राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. राज ठाकरेंनी तर चिथावणी देणारे वक्तव्य केलं आहे. पण मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यामुळे गृहविभागाच्या आदेशानेच राज ठाकरेंवर सहजरित्या जामीन मिळेल अशी कलमे लावण्यात आली आहेत.