औरंगाबाद मध्ये बॉम्बची अफवेने मजली खळबळ; शेवटी कळले की बॉम्ब नसून….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेआधी औरंगाबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

औरंगाबादेत बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. शोध घेतला असता बॉम्ब सदृश्य वस्तू एक पॉवर बँक असल्याचं आपसात निष्पन्न झाले. मात्र हे कळेपर्यंत सगळ्यांनाच घाम फुटला होता. औरंगाबाद शहरातल्या स. भू. महाविद्यालय परिसरामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. याबाबत बॉम्बशोधक पथकाला याबाबत कळवल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.

औरंगाबादमध्ये बॉम्बच्या अफवा पसरल्यामुळे संपूर्ण शहरात दहशत पसरली होती. अखेर बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असता बॉम्ब सदृश्य वस्तू ही पॉवर बँक असल्याचे निष्पन्न झाल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलीस यंत्रणा संतर्क

येणाऱ्या 8 जून रोजी औरंगाबादेत मुख्ममंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर बॉम्बच्या अफवेमुळे आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली असून आता औरंगाबाद मध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!