७५ हजार रुपयात घरी आणा Tata Nexon, द्यावा लागेल किती EMI? जाणून घ्या..

Auto Update : भारतीय अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी (Tata Motors ) टाटा मोटर्सने बाजारात मोठी झेप घेऊन सर्वाधिक वाहन विक्रीच्या बाबतीत कंपनी सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यातसुद्धा प्रामुख्याने या कंपनीने SUV सेगमेंटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Tata Motors SUV आणि मिड साईज SUV देशात चांगली कामगिरी करत आहेत. कंपनीची Tata Nexon (टाटा नेक्सॉन) ही देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीं-पैकी एक एसयूव्ही कार आहे.

जर तुम्हाला देखील ही TATA NEXON खरेदी करायची इच्छा असेल परंतु बजेटमुळे थांबला असाल तर आता काळजी नको, कारण आम्ही तुम्हाला या कारच्या EMI पर्यायायंबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्ही केवळ ७५ हजार रुपयांच्या डाऊनपेमेंट देऊन ही शानदार एसयूव्ही घरी आणू शकता…

टाटा मोटर्सने मागील महिन्यातील (एप्रिल २०२२) वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहे. एप्रिल महिन्यात कंपनीने नेक्सॉनच्या १३ हजार ४७१ युनिट्सची विक्री केली आहे. मायलेज, सेफ्टी, लुक, रेंज आणि दमदार फीचर्समुळे या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

केकेला ॲसिडिटीच्या गोळ्या घेणे पडले महागात..

७५ हजारांचं डाऊनपेमेंट वर किती ईएमआय होईल?

ही तुम्ही नेक्सन ७५,००० रुपयांचे डाऊनपेमेंट देऊन खरेदी करू शकता. Nexon ची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) ७.५४ लाख रुपये इतकी आहे. ७५ हजार रुपयांचं डाऊनपेमेंड देऊन तुम्ही ८ टक्के व्याजदरावर ५ वर्षांच्या कालावधीसाठी ही कार खरेदी करु शकता. त्यानंतर आपल्याला प्रति महिना १५ हजार ६३४ रुपये इतक्या EMI प्रमाणे ५ वर्षामध्ये १ लाख ६७ हजार ८ रुपये इतकं व्याज द्यावे लागेल. मात्र लक्षात ठेवा तुमच्याकडे योग्य कागदपत्र आल्यावरच हे कर्ज मंजूर होईल. हे कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर या सर्व गोष्टी तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून आहेत. तुमचा बँकिंग किंवा CIBIL स्कोर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

सुरक्षित कार

Tata या कंपनीने Nexon मध्ये XE, XM, XZ, XZ+ आणि XZ+(O) सोबत डार्क एडिशन ट्रिम सह अनेक व्हेरियंट्स सादर केलेली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटकरीता १३.७३ लाख रुपये मोजावे लागतील. ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत अती उत्तम आहे. Global NCAP सेफ्टी रेटिंग्समध्ये या कारने ५ स्टार स्कोर मिळवला आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले असून यामध्ये प्रीमियम लेदरेट व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्यूरिफायर आणि ऑटो डिमिंग IRVM असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!