केकेला ॲसिडिटीच्या गोळ्या घेणे पडले महागात..

ऍसिडिटी म्हणत त्रासाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक..

आपल्या सुरेल आवाजाने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक केकेचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. कोलकत्ता येथे एका कॉन्सर्टमध्ये गाता गाता त्रास होऊ लागल्यामुळे केकेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि अवघ्या ५३ व्या वर्षी त्याला मृत्यूने गाठले. त्यामुळे कमी वयामध्ये होणाऱ्या हृदय-रोगाच्या समस्येवर चर्चा सुरू झाली आहे. केकेच्या पत्नीने दिलेल्या माहितीप्रमाणे केके जास्त प्रमाणात पित्तशामक (acidity) गोळ्या घेत होता असे स्पष्ट झाले आहे. हृदयरोगासाठी याप्रकारच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेणे हेही एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हार्टॲटॅक हा फक्त ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, ताण-तणाव किंवा व्यसने यामुळेच होतो असे आपल्याला नेहमी वाटते. पण हार्ट-ॲटॅक येण्यासाठी पचनाशी निगडीत तक्रारी असणे हेसुद्धा एक मुख्य कारण असल्याचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुभेंदू मोहंती यांनी ‘इंडियन एक्सप्रेसशी’ बोलताना सांगितले. तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास आहे का? या उपायांचा अवलंब करा..

बऱ्याचदा ॲसिडीटी आणि हार्ट ॲटॅकची लक्षणे सारखी असतात. छातीत दुखणे आणि जळजळल्यासारखे होणे हे हार्ट ॲटॅकचे लक्षण असू शकते. सततची जागरण करने, जंक फूडचे सेवन, व्यसन, वाढते ताण-तणाव यासारख्या कारणांमुळे होणारे पित्त (acidity) दिवसेंदिवस वाढत जाते. आणि मग मळमळ, उलट्या, पोटामध्ये आग होणे, छातीमध्ये जळजळ, गॅसेस यांमुळे जीव कासावीस होऊन जातो. अशावेळी वारंवार या गोळ्या घेतल्याही जातात. आपणही अनेकदा पित्त (acidity) झाले की वेग-वेगळ्या गोळ्या मेडिकलमधून आणतो आणि घेतो. मात्र त्याचा शरीरावर दूरगामी परीणाम होतो हे आपण लक्षात घेतच नाही.

पित्ताच्या (acidity) गोळ्या महिन्या दोन महिन्यातून केवळ ५ ते ७ दिवसांपर्यंत घेतल्या तर ठिक आहे. मात्र ६ आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या घेत राहीले तर त्याचा किडनी वर घातक परिणाम होतो, याबरोबरच या औषधांमुळे मेंदू, हृदय यांच्यावरसुद्धा परिणाम होतो. शरीरामधील रासायनिक घटक किडनी आणि यकृत या अवयवांमधून बाहेर टाकले जातात. मात्र या घटकांचे प्रमाण जास्त झाले तर ते संबंधित अवयवाला बाधक ठरतात. शिवाय औषधांमधील हे रासायनिक घटक रक्तात साचत राहतात. शरीर हे घटक शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करते मात्र पुरेशा प्रमाणात ते बाहेर टाकले गेले नाहीत तर त्याचा अवयवावर परिणाम होतो. असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास आहे का? या उपायांचा अवलंब करा..

Similar Posts