डिजिटल व्यवहार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

सध्याच्या काळामध्ये Online व्यवहारांत मोठी वाढ झालेली असताना फसवणूकीच्या घटना देखील वाढत आहेत. म्हणूनच ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमचे बँक खाते सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहील.

▪️ लॉग इन सिक्योरिटी :

डिजिटल ट्रान्सझॅक्शन करताना लॉग इन करावे लागते. डिजिटल ट्रान्सझॅक्शन हा पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. त्यामुळे अवघड जाणारा पासवर्ड ठेवावा, शिवाय हा पासवर्ड वेळच्या वेळी बदलत राहावे. याशिवाय तुमचा युझर ID, पासवर्ड किंवा पिननंबर डिटेल्स कोणाबरोबर शेअर करू नका. कारण कोणतीही बँक तुम्हाला कधीच अशी डिटेल्स (युझर आयडी, पासवर्ड, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी किंवा कार्ड नंबर) विचारत नाही. चुकून सुद्धा तुमच्या युझर आयडी आणि पासवर्ड कंप्युटर, मोबाईल किंवा टॅबवर सेव्ह करू नका. तुमच्या डिव्हाईसवर ऑटो सेव्ह किंवा रिमेम्बर फंक्शन डिसेबल्ड करणे केव्हाही चांगले.

▪️मोबाईल बँकिंग :

मोबाईल बँकिंगसाठी नेहमी अवघड पासवर्ड आणि बायोमेट्रिक परमिशन मोड एनेबल्ड कराव. चुकूनसुद्धा तुमचा मोबाईल पिन कोणासोबतहि शेअर करू नये. जर तुम्ही बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन वापरत असाल तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीने केव्हाही चांगले आहे. अज्ञात एप्लिकेशन्स डाऊनलोड करणे आणि सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा.

▪️ कार्ड सिक्योरिटी :

क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करताना ATM मशीन किंवा पीओएस डिव्हाईसेसवर लक्ष ठेवावे. पिन नंबर टाकताना कीपॅड झाकून ठेवावा. डेबिट कार्ड द्वारे केलेले पेमेंट फक्त ऑनलाईन बँकिंगद्वारेच करावे. तुम्ही ज्याला पैसे देत आहात त्याची सत्यता तपासावी. कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी लिमिट सेट करून ठेवावी.

▪️UPI सिक्योरिटी :

मोबाईल अनलॉक पिन आणि UPI ट्रान्सझॅक्शन पिन वेगवेगळा ठेवा. कोणत्याही अनोळखी UPI रिक्वेस्टला प्रतिसाद देणे टाळावे. संशयास्पद रिक्वेस्टची तक्रार करावी. आणि तुमच्या नकळत कोणताही पेमेंट झाले असेल तर लगेच UPI सर्व्हिस डिसेबल करा.

▪️इंटरनेट सिक्योरिटी :

बँकेची वेबसाईट उघडताना नेहमी https कडे लक्ष द्यावे. शिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणचा वाय-फाय नेटवर्क वापरून ऑनलाईन पेमेंट करणे टाळावे. तसेच तुमचे काम पूर्ण झाल्यावर लॉग आऊट करून ब्राउझर बंद करावे.

▪️ सोशल मीडिया सिक्योरिटी :

तुम्ही समाज माध्यमांवर ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात त्याची ओळख पडताळावी. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची आर्थिक, वैयक्तिक आणि गोपनीय माहितीची चर्चा करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!