हाय गर्मी….कडक उन्हाळ्यात कशी घ्याल स्वतःची काळजी?

यंदाचा उन्हाळा खूप तीव्र स्वरुपाचा असल्याने एप्रिलमध्येच मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. उष्णता इतकी वाढली की, अनेक आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहारा बरोबरच भरपूर पाणी पिणे, आदी बाबींचे पालन करण्याचा डॉक्टर देखील सल्ला देतात.

उन्हाळ्यात ‘या’ आजारांची शक्यता

हिवाळा, पावसाळ्या प्रमाणेच उन्हाळ्यातदेखील अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. यामध्ये उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

कशी काळजी घ्याल?

▪️उन्हाळ्यात शक्यतो पचायला हलका व कमी आहाराचे सेवन करावे. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात बरोबर, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे. जेवणानंतर ताक सुद्धा घ्यावे.

▪️टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन करावे.

▪️आहारात थंड तुपाचा समावेश करावा.

▪️नारळाचे पाणी, ऊसाचा ताजा रस, कोकमचे सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा.

▪️जास्त मांसाहार टाळावा.

अधिकाधिक पाणी प्यावे!

उन्हाळ्यात घामाच्या स्वरूपात उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे शरीराची त्वचा आतून व बाहेरून कोरडी पडते. यावेळी उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे वेळो वेळी थंड पाणी पीत राहावे. मात्र थंड पाणी फ्रीज मधील नाही तर माठातील असायला हवे. तसेच उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.

उष्माघात टाळण्याठी काय कराल?

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने चक्कर येऊन अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यास रुग्णाला थंड वातावरणामध्ये शांत झोपवावे, शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. तसेच डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी.

उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीत जास्त द्रव आहार द्यावा, लिंबू सरबत द्यावे, ताप आला असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे, दुपारी 12 ते 5 यावेळेस अत्यावश्यक कामाशिवाय उन्हात घराबाहेर पडणे टाळावे.


टीप : वरील सर्व बाबी ABDnews केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहे. यातून ABDnews कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!